पुणे

गणेशोत्सवापूर्वीच कलाकारांचे ‘बुकिंग फुल्ल’

CD

पुणे, ता. २९ ः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने मंडळे, सोसायट्या आणि आयोजकांकडून उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनालाही सुरुवात झाली असून, कलाकारांचे कार्यक्रम आरक्षित होऊ लागले आहेत. विशेषतः मुलांना मोबाइल आणि स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणाऱ्या कार्यक्रमांना यंदा पसंती मिळत आहे.
चौदा विद्या अन् चौसष्ट कलांचा अधिपती अर्थात ‘कलाधिपती’ असणाऱ्या श्रीगणेशाच्या उत्सवात सगळीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवातील दहाही दिवस सार्वजनिक गणेश मंडळांसह गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात गायन, वादन, नृत्य, एकपात्री प्रयोग, नाट्यप्रयोग, कीर्तन यांसोबतच जादूचे प्रयोग, पपेट शो, बबल्स शो, गेम शो, विज्ञानाधारित प्रयोग आणि संवादात्मक कार्यक्रमांचा समावेश असतो.
दरवर्षी या कार्यक्रमांना भरपूर मागणी असली, तरी मधल्या काही वर्षांमध्ये मोबाइल आणि स्क्रीनच्या वाढत्या प्रभावामुळे कार्यक्रमांची संख्या काहीशी कमी झाली होती. मात्र, स्क्रीनचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागल्यावर पुन्हा एकदा प्रत्यक्ष कार्यक्रमांची मागणी वाढली आहे. केवळ कार्यक्रम पाहण्यापेक्षा मुलांनी आणि कुटुंबीयांनी त्यात सहभागी व्हावे, या उद्देशाने मनोरंजनात्मक कार्यक्रमांना यंदा प्राधान्य दिले जात असल्याचे निरीक्षण कलाकारांनी नोंदविले.

सांस्कृतिक अर्थकारणाला चालना
मोबाइल, विविध डिजिटल माध्यमांमध्ये रमलेल्या मुलांना प्रत्यक्ष कलाविष्काराचा अनुभव देण्यासाठी पालक आणि सोसायट्यांकडूनही अशा कार्यक्रमांना पसंती मिळत आहे. त्यामुळे बबल्स शो, पपेट शो, गेम शो, एकपात्री सादरीकरण यांसारख्या कार्यक्रमांसाठी कलाकारांकडे विचारणा वाढली आहे. मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांना, नाटकांनाही मागणी आहे. यातून कलाकारांना व्यासपीठ, रोजगाराची संधी मिळत असून, उत्सवाच्या सांस्कृतिक अर्थकारणालाही चालना मिळत आहे.

आजच्या प्रेक्षकांना केवळ कार्यक्रम पाहायचा नसतो, तर त्यात सहभागी व्हायचे असते. बबल्स शोमध्ये मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभागी होतात. पपेट शोमधून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देता येतो, तर गेम शो संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतो. यंदाच्या गणेशोत्सवासाठी माझ्या अनेक कार्यक्रमांचे आगाऊ आरक्षण झाले असून, सध्या माझे वेळापत्रक जवळपास ‘हाउसफुल’ झाले आहे.
- चैताली माजगावकर-भंडारी, पपेट व बबल आर्टिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

SCROLL FOR NEXT