पुणे

वाचकांचे पत्र

CD

नमस्कार...
मी एक सामान्य नागरिक, सार्वजनिक गणेश मंडळांना काही सांगू इच्छितो, खरं तर गणपती येणार म्हटले, की मनात कसा उत्साह भरून राहतो; पण तो आता भूतकाळ झाला आहे. आता गणपती येणार म्हटले, की मन उदास होऊन जाते. आपण गणेश उत्सव कोणत्या पातळीवर आणून ठेवला आहे. या विचाराने मन व्यथित होते. अक्षरशः गणेश उत्सवाचा धाक मनात बसलाय याला कारण म्हणजे ध्वनिवर्धक यंत्रणांचा दणदणाट. मंडळाच्या कार्यकर्त्यांना, अध्यक्षांना कळकळीची विनंती आहे, की ध्वनिवर्धक यंत्रणांच्या भिंती नका वाजवू मिरवणुकीत. एक तर यामुळे लहान मुले, वृद्ध व रुग्ण किंबहुना सर्वच शांतताप्रिय माणसांना प्रचंड त्रास होतो. मनस्ताप होतो. खरे तर आपणास सर्वांची शांतता भंग करण्याचा काय अधिकारी आहे? दुसरी गोष्ट म्हणजे आपला देव इतका उथळ आहे? त्याला आवडत असेल हे सगळे गोंधळ, दणदणाट, लेझर लाइट, ही भक्ती नाही किंवा हे अध्यात्मही नाही. हा फक्त धांगडधिंगा आहे. आपण गणपतीला वेठीला धरतो आहोत. त्याला रथात बसवून आपल्या जे आवडतंय ते आपण कारत आहोत. लेझर लाइट किती धोकादायक आहेत हे सिद्ध झालं आहे. त्याचा उपयोग मिरवणुकीत करू नका. गणपती उत्सवात आपण भक्तीचा सोहळा अनुभवातून, चित्तवृत्ती प्रसन्न झाल्याचे अनुभवया. इतर धार्मिक लोक त्यांच्या देवाला असेच ओंगळवाणे स्वरूप देऊन उत्सव साजरा करत नाही. आपणही हा उत्सव सात्त्विकपणे साजरा करायला हवा. मिरवणुकीत ढोलपथक, बॅण्ड पथक, लेझीम इत्यादींचा आधार घेऊन आपण मिरवणूक देखणी, आकर्षक करू शकतो. ध्वनिवर्धक यंत्रणांला फाटा देऊन मंडळे, मंडळाचे अध्यक्ष आदराला पात्र होऊ शकतात.

- सामान्य नागरिक, सातारा

------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Prices Soar : आळेफाटा उपबाजारात कांद्याला किलोला ४२ रुपये उच्चांकी दर; आवक वाढली तरी भावात उसळी, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

SCROLL FOR NEXT