पुणे

विलोभनीय मूर्ती साकारण्यासाठी गणेश मूर्तिकारांची लगबग...यंदाचा गणेशोत्सव १० ऐवजी १२ दिवसांचा

CD

PDR26B09953
पंढरपूर : गणेश मूर्तींना अंतिम रंगकाम करताना मूर्तिकार. (छायाचित्र : राजकुमार घाडगे, पंढरपूर)
---
बाप्पा येतोय! पंढरपूरच्या कुंभारवाड्यात लगबग
सार्वजनिक मंडळांकडून आगाऊ बुकिंग; मूर्तिकारांकडून अखेरच्या रंगकामाला वेग
राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ३० : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभारवाड्यात आणि गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये बाप्पाच्या विलोभनीय मूर्ती साकारण्यासाठी गणेश मूर्तिकारांची प्रचंड लगबग सुरू आहे. यंदाचा गणेशोत्सव १० ऐवजी १२ दिवसांचा असल्याने गणेशभक्त आणि सार्वजनिक मंडळांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत असून, मूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी कारागीर रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे १५ दिवस उरले असून, या वर्षी १४ सप्टेंबर रोजी गणेश जयंती आहे. त्यामुळे सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गणेशमूर्ती घडविणारे मूर्तिकार मूर्तीच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत.
यंदा श्रीरामरूपी गणेश आणि राधा-कृष्णरूपी गणेशमूर्तींना बालगणेश मंडळातील गणेशभक्तांची मोठी पसंती मिळत असल्याचे येथील मूर्तिकार ओंकार कुंभार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. सध्या येथील कुंभारवाडा आणि इतर कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
---
बॅलेन्सिंग गणेशमूर्तींना यंदा विशेष पसंती
यंदाच्या गणेशोत्सवासाठी विविध आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण रूपांतील गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. सिद्धिविनायक, लालबागचा राजा, एका पायावर उभी असलेली गोड गणेशाची बॅलेन्सिंग मूर्ती, दोन मयूर आणि प्रभावळ असलेली कौस्तुभमणी मूर्ती, श्री शंकर तांडव नृत्यमूर्ती, शेषनाग गणेशमूर्ती, सरस्वती वीणावादन आणि राजहंसावर आरूढ मूर्ती, खंडेराया जयमल्हार मूर्ती अशा विलोभनीय रूपातील मूर्तींना सार्वजनिक गणेश मंडळांकडून विशेष मागणी आहे.
---
कोट
एकाच आधारावर उभ्या असणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘बॅलेन्सिंग’ मूर्तींची सार्वजनिक मंडळांमध्ये यंदा विशेष क्रेझ आहे. सर्व मूर्तींचे आगाऊ बुकिंग झाले असून, सध्या मूर्तींवर अखेरचे रंगकाम करण्यात व्यस्त आहोत. या वर्षी पीओपी आणि रंगाच्या दरामध्ये वाढ झाल्याने मूर्तींच्या किमतीमध्ये २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे.
- नागेश कुंभार, मूर्तिकार, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने NEET PG Exam रद्द, फेरपरीक्षा कधी? तारीख आली समोर

Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफीत अचानक बदललं चित्र! इशान किशनला नेमकं काय झालं? १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे आली कर्णधारपदाची धुरा

Nepal Flood : नेपाळच्या महापुरादरम्यान थरारक घटना ! एका साडीने वाचवला २१ जणांचा जीव; चेन्नईतील भाविकांनी सांगितली आपबीती

Vastu Tips: जुन्या कपड्यांनी फरशी पुसणे योग्य की अयोग्य? 'या' चुकीमुळे वाढू शकते आर्थिक टंचाई! वास्तूनुसार जाणून घ्या नियम...

Rich Zodiac Signs: या राशीच्या लोकांना पैसा कमावण्याची असते खास कला; आर्थिक बाबतीत असतात हुशार ,तुमची रास कोणती ?

SCROLL FOR NEXT