Crime esakal
पुणे

Pune Crime : गणेशोत्सवात दोन लाखांची वर्गणी न दिल्याने मारहाण

गणेश मूर्ती खरेदीसाठी दोन लाख रुपयांची वर्गणी न दिल्यामुळे मेट्रोच्या पुलाचे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेश मूर्ती खरेदीसाठी दोन लाख रुपयांची वर्गणी न दिल्यामुळे मेट्रोच्या पुलाचे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली.

या प्रकरणी शरद हरिभाऊ उगले (वय ६२, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. श्रीकांत संतोष मरळ असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेड ब्रिजजवळ खाऊ गल्लीत एका ठेकेदार कंपनीकडून मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कॉंक्रिटचे काम सुरू आहे.

त्यावेळी मरळने गणेशोत्सव मंडळाची मूर्ती खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्याकडे दोन लाखांची मागणी केली होती. परंतु त्यांनी वर्गणी दिली नाही. त्यामुळे मरळने लाकडी दांडके आणि फावड्याने अधिकाऱ्याला मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निकुंभ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT