पुणे

गरबा खरा कसा व आताचा गरबा कसा

CD

गरबा नृत्य नव्हे, भक्तीआराधनेचा उत्सव!
देवीपूजन, पारंपरिक गुजराती गीते आणि आरतीतून जपूया मूळ परंपरा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : नवरात्रातील गरबा आणि दांडिया हा केवळ नृत्याचा कार्यक्रम नसून आदिशक्तीच्या आराधनेची परंपरा आहे. मात्र, पारंपरिक भक्तिगीतांच्या जागी चित्रपटगीतांवर नृत्य करण्याचे प्रकार वाढल्याने गरब्याचे मूळ स्वरूप बदलत आहे. त्यामुळे देवीपूजन, पारंपरिक गुजराती गीते आणि आरती यांना प्राधान्य देऊन गरब्याचे पावित्र्य जपण्याची गरज आहे.
गरबा परंपरेचा उगम गुजरातमध्ये झाला. या नृत्याची सुरुवात देवीच्या प्रतिमेची स्थापना आणि पूजनाने केली जाते. त्यानंतर ‘कनेळो’ या भक्तिगीताने गरब्याला प्रारंभ होतो. दोढिया, मंडली, एकताली, दोताली, ग्रुप गरबा, पंचिया आणि सनेडो असे त्याचे विविध प्रकार आहेत. कच्छ भागात विकसित झालेला मटुकडी हा प्रकारही सादर केला जातो.
पूर्वी गरब्याचे मूळ स्वरूप अनेकांना माहिती नसल्याने पारंपरिक पद्धतीकडे दुर्लक्ष होत असे. आता मात्र सोशल मीडियावर पारंपरिक गरब्याचे प्रकार सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे चित्रपटगीतांऐवजी देवीच्या भक्तिगीतांना प्राधान्य देणे, तसेच गरब्याच्या मध्यंतरात किंवा शेवटी देवीची आरती करणे आवश्यक आहे.
------------------
भक्तीतून मिळतो खरा आनंद
गरबा हा भक्तिप्रधान आराधनेचा प्रकार आहे. पारंपरिक पद्धतीने गरबा सादर केल्यास सहभागी व्यक्तींना तणावमुक्त आनंदाचा अनुभव मिळतो. त्यामुळे नृत्याचा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न करता त्यामागील आध्यात्मिक परंपरा जपली पाहिजे, असे मत गरबा नृत्यतज्ज्ञ व मार्गदर्शक देवांशी जव्हेरी यांनी व्यक्त केले.
------------------
चौकट :
दांडिया खेळताना काय जपावे?
- नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून गरब्याला सुरुवात करावी.
- गरब्याच्या ठिकाणी देवीची प्रतिमा स्थापन करून पूजन करावे.
- देवीच्या भक्तिगीतांना प्राधान्य द्यावे.
- पारंपरिक गुजराती गरबागीतांचा समावेश करावा.
- मध्यंतरात किंवा शेअवटी देवीची आरती करावी.
-----------------------
कोट :
मूळ गुजराती गरबा पद्धतीत नवरात्रीचे पावित्र्य जपले जाते. पारंपरिक नृत्याला चित्रपटगीतांच्या तालावरील नृत्याचे स्वरूप देणे चुकीचे आहे.
-देवांशी जव्हेरी, गरबा नृत्यतज्ज्ञ व मार्गदर्शक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT