पुणे

गेवराईत ज्वारी साडेचार हजाराच्या पुढेच!

CD

गेवराईत रब्बी ज्वारी
साडेचार हजारांच्या पुढे

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
गेवराई, जि. बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात रब्बी ज्वारीची सुमारे ४८४ क्विंटल आवक झाली. या ज्वारीला सरासरी ४७५० ते ५४८८ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी ज्वारीची ३३ ते १४३ क्विंटल दरम्यान आवक झाली. ज्वारीचा कमीत कमी दर ३५०० तर जास्तीत जास्त दर ६३२६ रुपये प्रति क्विंटल राहिला. गेवराई बाजार समितीमध्ये बाजरीची २६५ क्विंटल आवक झाली. १२ ते ९८ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला सरासरी २६०० ते ३००३ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. बाजरीचे कमीत कमी दर २२७० रुपये तर जास्तीत जास्त दर ३१७० रुपये प्रति क्विंटल राहिला. मुगाची एकूण आवक ५१ क्विंटल आवक झाली. २ ते १२ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या मुगाला सरासरी ७५०० ते १०००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. पांढऱ्या तुरीची एकूण आवक ५७ क्विंटल झाली. ३ ते २० क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या पांढऱ्या तुरीला सरासरी ९८६२ ते १०५५७ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला.
आठवड्यात केवळ दोन वेळा उडीदाची २ क्विंटल आवक झाली. या उडीदाला सरासरी ९००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. एक वेळा एक क्विंटल आवक झालेल्या मकाला २४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

सोयाबीनचे सरासरी ६३०० च्या पुढे
गेवराई बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सोयाबीनची ११०३ क्विंटल आवक झाली. ११९ ते २९६ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात मिळून आवक झालेल्या या सोयाबीनला सरासरी ६३५७ ते ७११५ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shoumika Mahadik Gokul Election : गोकुळमध्ये धक्कादायक निकालाची शक्यता; शौमिका महाडिक यांचं काय होणार? राजू आवळे, सुजित मिणचेकर यांना समान मते

Ladki Bahin Yojana 2026 : लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढच्या आठवड्यात जमा होणार 1500 रुपये? दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर...

ए, माझं बोलणं नीट ऐक... टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई गँगची सलमान खानला उघड उघड धमकी; म्हणाले-

Latest Marathi News Live Update : मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर; समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी घेतली आघाडी

SMRITI MANDHANA SHAIFALI VERMA RECORD: स्मृती-शफालीच्या जोडीने रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी

SCROLL FOR NEXT