Leopard Sakal
पुणे

Leopard : शेतकऱ्याने शेतपिकाला लावलेल्या जाळीत अडकला बिबटया

गंगापुर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे एका शेतकऱ्याने शेतपिकाच्या नुकसानीपासून बचाव व्हावा यासाठी लावलेल्या जाळीत आज (ता. ६) पहाटे बिबटया अडकला.

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव - गंगापुर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे एका शेतकऱ्याने शेतपिकाच्या नुकसानीपासून बचाव व्हावा यासाठी लावलेल्या जाळीत आज (ता. ६) पहाटे बिबटया अडकला. जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील डॉक्टर व रेस्क्यू टीमने दुपारी एकच्या दरम्यान बिबट्याला बेशुद्ध करून निवारा केंद्रात नेले आहे.

बिबट्या जाळीत अडकल्यानंतर पहाटे त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरीत घोडेगाव वनविभाग व रेस्क्यु टिमला कळवली. घोडेगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम .बी .गारगोटे यांनी त्वरित दखल घेऊन बिबट्याला रेस्क्यू टीमच्या साह्याने बेशुद्ध करून ताब्यात घेतले. त्यांनी गंगापूर बुद्रुक व परिसरातील गावांमध्ये धुमाकूळ घातला होता. शेळ्या, मेंढ्या ,कुत्री यांच्यावर हल्ला करून नुकसान केले होते.

काही दिवसांपूर्वी बिबटया ज्या जाळीत अडकला त्या ठिकाणपासून पन्नास फुट अंतरावर एका लहान कालवडीवर हल्ला केला होता. त्यावेळीपासून नागरिक शेतात जाताना घाबरत होते. आता बिबटया पकडला गेल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या अडकलेल्या बिबटयाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

दरम्यान बिबटयाला पकडण्यासाठी बेशुध्द करावे लागणार होते. त्यासाठी जुन्नर हून रेस्क्यू टीम येणार होती. बिबटया पकडण्यास आलेल्या टीमने वनविभाग व रेक्यु टीमच्या मदतीने दुपारी १ च्या सुमारास बिबटयाला जेरबंद केले. या परीसरामध्ये अजून दोन ते तीन बिबटे असल्याची भिती गावकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे हे बिबटे पकडावे अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT