पुणे, ता. ३० : पोटातील जवळपास २० टक्के भाग मूळ जागेतून बाहेर आल्यामुळे निर्माण झालेल्या ‘जायंट ॲबडोमिनल हर्निया’ या आजाराने त्रस्त असलेल्या ३२ वर्षीय तरुणावर इनामदार रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. दुर्बिणीद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून पोटाच्या भिंतीची पुनर्बांधणीदेखील डॉक्टरांनी केली.
या रुग्णाच्या पोटाच्या बेंबीजवळ गेल्या दोन वर्षांपासून सूज वाढत होती. उभे राहिल्यावर किंवा खोकल्यावर ही सूज अधिक स्पष्ट जाणवत असे. कालांतराने ही सूज वाढली व रक्तस्राव सुरू झाला होता. तपासणीत हर्नियाचा आकार ३५ बाय २० सेंटीमीटर इतका मोठा झाला होता व लहान आणि मोठ्या आतड्यांचा काही भाग पोटाच्या बाहेर आला होता. अशावेळी सर्व अवयव पुन्हा आत ढकलून छिद्र बंद केल्यास पोटातील दाब वाढून श्वसनास त्रास होऊ शकतो. रुग्णाला लठ्ठपणा आणि मधुमेह असल्याने पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये संसर्गाचा धोका अधिक होता. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये पोटाच्या स्नायूंना मोकळे करून ताण न देता पोटाच्या भिंतीची पुनर्बांधणी करण्यात आली. डॉ. अभिजित गोतखिंडे यांनी या रुग्णावर उपचार केले.
पोटाचा हर्निया दुर्लक्षित केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणे आवश्यक असल्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला मोठ्या जखमेविना आणि कमी त्रासात नवीन आयुष्य मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.