murder sakal
पुणे

Pune Crime : प्रेमसंबंधास विरोध केल्याने मैत्रिणीच्या आईचा गळा आवळून खून

‘माझ्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवू नकोस,’ असे बजावल्याने एका तरुणाने मैत्रिणीच्या आईचा पट्ट्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘माझ्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवू नकोस,’ असे बजावल्याने एका तरुणाने मैत्रिणीच्या आईचा पट्ट्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाषाण- सूस रस्त्यावरील एका सोसायटीत ही घटना घडली.

वर्षा जगदीश क्षीरसागर (वय ५८, रा. माउंटव्हर्ट ॲल्टसी सोसायटी, पाषाण-सूस रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. शिवांशू दयाराम गुप्ता (वय २३, रा. प्रतीकनगर, मोहनवाडी, येरवडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तरुणीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि शिवांशू दोघे आयटी पार्कमध्ये काम करीत होते. शिवांशू सध्या बेरोजगार होता. त्यांच्यात मागील सात महिन्यांपासून मैत्रीचे संबंध होते. काही कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. तरुणीने शिवांशूला प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. तरुणीची आई वर्षा क्षीरसागर यांचाही त्यांच्या प्रेमाला विरोध होता.

त्यांनी ‘माझ्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवू नको,’ असे तरुणाला बजावले होते. त्याचा राग शिवांशूच्या मनात होता. तो १८ जानेवारी रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास सोसायटीत गेला. त्यावेळी वर्षा एकट्याच घरी होत्या. त्याने श्वानाला बांधण्यासाठी असलेल्या पट्ट्याने वर्षा यांचा गळा आवळून खून केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, वर्षा यांचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले.

आत्महत्या केल्याचा रचला बनाव

आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बेडरूमध्ये ठेवला. कोणाला संशय येऊ नये, यासाठी बेडरूमच्या बाहेर येऊन त्याने दोरीच्या साहाय्याने आतून दरवाजा बंद करून घेतला. त्याने महिलेने आत्महत्या केल्याचा असा बनाव रचला. परंतु सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT