पुणे

‘ग्लोबल गुरुजी’साठी १,१८७ शिक्षक

CD

पुणे, ता. १० : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमाला शिक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमासाठी शिक्षकांच्या निवडीच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर एक हजार १८७ शिक्षकांनी निवड परीक्षेत सहभाग घेतला. निवड झालेल्या शिक्षकांना सिंगापूर येथील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेने पुढील आर्थिक वर्षात ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ५० उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून त्यांना परदेशातील प्रगत शिक्षणपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. आधुनिक अध्यापन तंत्र, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, डिजिटल साधनांचा वापर, कौशल्य आधारित शिक्षण आणि शाळा व्यवस्थापनातील प्रभावी पद्धती यांचा प्रत्यक्ष अनुभव शिक्षकांना मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सिंगापूर येथील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास शिक्षकांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील प्रगती, वर्गातील नावीन्यपूर्ण उपक्रम, शिष्यवृत्ती व विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी तसेच शाळेच्या प्रगतीत शिक्षकांचे योगदान या निकषांवर निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या परीक्षेला एक हजार १८७ शिक्षकांनी प्रतिसाद दिला.


अभ्यास भेटीनंतर ‘फेलोज’
अंतिम निवड झालेल्या शिक्षकांना परदेशातील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर ‘टीचर इनोव्हेशन फेलोज’ म्हणून जिल्ह्यात काम करणार आहेत. हे शिक्षक इतर शिक्षकांसाठी प्रात्यक्षिक वर्ग घेतील, प्रशिक्षण कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित करतील. त्यामुळे ५० शिक्षकांचा परदेशातील अनुभव जिल्ह्यातील अन्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT