Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : वाघोलीत दोन चोरीच्या घटनेत दहा तोळे सोन्याचे दागीने लंपास

घराची खिडकी व सदनिकेच्या गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवणे दोन कुटुंबियांना चांगलेच महागात पडले. दोन्ही घटनेत मिळून सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : घराची खिडकी व सदनिकेच्या गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवणे दोन कुटुंबियांना चांगलेच महागात पडले. दोन्ही घटनेत मिळून सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली. एक घटना कोलवडी येथे तर दुसरी घटना वाघोलीतील गेरा सोसायटी मध्ये घडली. दोन्ही प्रकरणी लोणीकंद पोलीसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलवडी येथील संत रोहिदास नगर मधील घटनेत उकाडा जास्त असल्याने हॉलमधील खिडकी अर्धवट उघडी ठेवून घरातील कुटुंबीय झोपले. मध्यरात्री घरातील महिलेला जाग आल्यानंतर हॉलचा दरवाजा उघडा व हॉलमधील साहित्य अस्ताव्यस्त झालेले दिसले.

घरातील साहित्य तपासले असता कपाटात ठेवलेले ३.५ तोळ्याचे सोन्याचे दागिने, पैंजण व रोख २२ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. खिडकीतून कशाच्यातरी सहाय्याने दरवाजा उघडून चोरी केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अशोक गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

दुसऱ्या घटनेत दुसऱ्या मजल्यावरील सदनिका पती पत्नी बंद करून बाहेर गेले. मात्र त्यांच्या गॅलरीचां दरवाजा उघडाच होता. त्याचाच फायदा घेवून चोरट्यांनी डाव साधला. उघड्या दरवाजा द्वारे सदनिकेत प्रवेश करून चोरट्यांनी बॅगमध्ये ठेवलेले ७.२ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. पती पत्नी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी धीरेंद्र देवडा यांनी फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT