पुणे

परकीय चलन वाचविण्यासाठी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवर

CD

सोने-चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवर

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १३ : सोने खरेदीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मंगळवारी  सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली. सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्क  सहा टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत  वाढविले असून, त्यात  १० टक्के मूळ सीमा शुल्क आणि ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास अधिभाराचा समावेश आहे. आयात शुल्क वाढल्यामुळे १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत अंदाजे १३,००० ते १५,००० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीयांना सोन्याची गरज पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. सोने खरेदी करण्यासाठी डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतात.  पश्चिम आशियातील अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत देशाचे परकी चलनाचा साठा जपून वापरणे आवश्यक असल्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदीपासून  परावृत्त करण्यासाठी सोने महाग होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे सोने आणि चांदीवरील  आयात शुल्क १५ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
सोने हे प्रामुख्याने गुंतवणूक आणि उपभोग्य, मात्र  गरजेची वस्तू नसल्यामुळे तिची आयात कमी करण्यावर सरकारने भर दिला आहे.  देशाच्या अर्थव्यवस्थेला साथ देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना किमान एक वर्ष सोने खरेदी टाळावे, या  आवाहनाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. 

परकी चलन वाचविण्यासाठी उपाय
- वार्षिक आयातीत  सोने-चांदीच्या आयातीवर सुमारे ९५ ते १०० अब्ज डॉलर खर्च होतात.
-  विदेशी चलन साठ्याचे रक्षण करणे, डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या  रुपयाचे मूल्य टिकवून ठेवणे,  भारताच्या निर्यात आणि आयात यांच्यातील वाढती तूट  नियंत्रणात आणण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे.
- भारतापाशी असलेले  विदेशी चलन कच्चे तेल, खते आणि संरक्षण उपकरणांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी प्राधान्याने खर्च करावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT