Pune Traffic sakal
पुणे

Pune Transport : बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान चौकातील वाहतुकीत बदल

बकरी ईदनिमित्त लष्कर भागातील गोळीबार मैदान येतील ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. २९) आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बकरी ईदनिमित्त लष्कर भागातील गोळीबार मैदान येतील ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. २९) आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे गोळीबार मैदान चौकातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी सकाळी सहापासून नमाज पठणाची सांगता होईपर्यंत बदल करण्यात आले आहेत.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यानंतर लष्कर भागातील मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज्) दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे - गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग नमाज पठणाच्या वेळी बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी गोळीबार चौकातून डाव्या बाजूला वळून सीडीओ चौक येथून उजवीकडे वळून गिरिधर भवन चौकमार्गे उजवीकडे वळावे. ढोली पाटील चौकातून इच्छितस्थळी जावे.

सीडीओ चौक ते गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक सकाळी सहा ते अकरा दरम्यान पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. लुल्लानगरकडून लष्कर भागातील खाण्या मारुती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, नेपियर रोड, मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे वानवडी बाजार चौकाकडे जावे. गिरिधर भवन चौकातून लष्कर भागाकडे येणाऱ्या वाहनांनी ढोले पाटील चौकातून नेहरू रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

ढोले पाटील चौक ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौकातून इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून एम्प्रेस गार्डन आणि लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे. कोंढवा भागातून गोळीबार मैदानाकडे जाण्यास जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. ट्रक, एसटी बस, पीएमपी बसने लुल्लानगर चौकातून भैरोबानाला किंवा गंगाधाम चौकातून इच्छितस्थळी जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT