Gondhali-Society 
पुणे

बिदागीपेक्षा देवीची सेवा महत्त्वाची

प्रसाद पाठक

पुणे - ‘‘लहानपणी संबळ हाती धरला. देवीची गाणी गुणगुणत गोंधळही घालायला लागलो. वडिलोपार्जित कला आहे ही आमची! लौकिक अर्थाने कोणी इंजिनिअरिंगचे, तर कोणाचे बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले आहे.

उदरनिर्वाहासाठी शिक्षण घेतले असले, तरीही देवीच्या गोंधळातून बिदागीपेक्षा सेवा हाच आमचा मुख्य उद्देश! वंशपरंपरागत कला जोपासण्यासाटी आम्ही गाणी गाऊन देवीला सेवा वाहतोय,’’ असा अनुभव गोंधळी समाजातील हरीश पाचंगे, परेश गरुड व रवींद्र पाचंगे या उच्चशिक्षित तरुणांनी कथन केला.   

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मंदिरे, सामाजिक संस्था व घरोघरी देवीचा गोंधळ घालण्यात येत आहे. पूर्वी रात्रभर हा कार्यक्रम होत. आता मात्र एक ते दीड तासामध्ये हा कार्यक्रम होतो. गोंधळी समाजाची अनेक कुटुंबे पिढ्यान पिढ्या ही परंपरा जोपासत आहेत. गोंधळी व भटके विमुक्त जाती-जमाती संघातर्फे समाजातील उच्चशिक्षित तरुण सामाजिक कार्यातही सहभागी होत आहेत. याबाबत गोंधळी व भटके विमुक्त जाती-जमाती संघाचे अध्यक्ष भालचंद्र खडके म्हणाले, ‘‘वंशपरंपरागत कला आम्ही जोपासली, तरच पुढची पिढी ती जोपासेल. यासाठी समाजातील तरुणांना या कलेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.’’

परेश म्हणाले, ‘‘पिढ्यान पिढ्यांच्या यजमानांकडे गोंधळाचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. देवीची आरती म्हणायलासुद्धा जातो. बिदागीपेक्षा कला आणि सेवा हाच मुख्य उद्देश आम्ही जपतो. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत संतांनी रचलेल्या रचना सादर करतो.’’ रवींद्र म्हणाले, ‘‘प्रत्येक जिल्ह्यात व राज्यात गोंधळ सादर करण्याची पद्धती निराळी आहे. मात्र भाव एकच तो म्हणजे देवीची आर्त स्वरात आळवणी करणे होय. आमंत्रणानुसार सार्वजनिक मंडळे, सोसायट्यांतही गोंधळाचे कार्यक्रम करतो. यानिमित्ताने देशभर भ्रमंती होते. परराज्यांतूनही देवीचा गोंधळ घालण्यासाठी आमंत्रणे येतात.’’

मी लहानपणापासून संबळ वाजवायला शिकलो. संबळ वाजवितानाच गाणे म्हणावे लागते. गाणी, बतावणीतून गोंधळाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतो. मी इंजिनिअर असलो तरीही या कलेची आवड आहे. त्यामुळे तरुणांचे वर्गही घेतो. तसेच हिंदी भाषेतूनही कार्यक्रम करतो.
- हरीश पाचंगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT