‘अटल इनोव्हेशन मॅरेथॉन’अंतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर गुरुत्वीय दिव्याचे सादरीकरण करताना अनिकेत घिसाड, नचिकेत मेंडकी. 
पुणे

पुण्यात दगड-मातीच्या सहाय्याने बनविला गुरुत्वीय शक्‍तीचा दिवा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बाजारात महागडे गुरुत्वीय दिवे उपलब्ध असताना डॉ. शामराव कलमाडी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी हाच दिवा अवघ्या ५०० ते ७०० रुपयांत तयार करण्याची किमया केली आहे. गेले दोन वर्षे सतत प्रयत्न करून त्यांनी ही नवनिर्मिती केली. त्याचे त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समोर नुकतेच सादरीकरण केले. अनिकेत घिसाड आणि नचिकेत मेंडकी असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. 

कलमाडी हायस्कूलमध्ये ‘अटल इनोव्हेशन मिशन’अंतर्गत शाळेत ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापन केली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. बालदिनाच्या दिवशी ‘अटल इनोव्हेशन मॅरेथॉन’ मधील निवडक प्रकल्प म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर सादर करण्यात आले. या निमित्ताने कलमाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. गुरुत्वीय दिव्यामध्ये दगड-मातीचा वापर होत असून आणि गुरुत्वीय ऊर्जेद्वारे त्यांची हालचाल घडवून आणून त्यापासून प्रकाश निर्माण केला जातो. सध्या बाजारात २० मिनिटे प्रकाश देणारा गुरुत्वीय दिवा किमान १० हजार रुपयांना आहे. मात्र, या विद्यार्थ्यांनी यामध्ये अनेक सुधारणा करून दिव्यासाठीचा खर्च ५०० ते ७०० रुपयांवर आणला आहे. हा दिवा सध्या १० मिनिटे चालू शकतो. यात आणखी सुधारणा केल्यास तो एका तासापर्यंत चालविता येऊ शकतो, असे अटल टिंकरिंग लॅबमधील मार्गदर्शक स्वाती काळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT