Maharashtra Police 
पुणे

GTPMS मुळे पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार सोपी

‘जीटीपीएमएस’ प्रणाली विकसित; कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही होणार फायदा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिसांची बदलीसाठीची वेळखाऊ व त्रासदायक प्रक्रियेतून आता सुटका होणार आहे. पुणे पोलिस दलात पहिल्यांदाच शहरांतर्गत बदल्यांसाठी ‘सर्वसाधारण बदली पोलिस व्यवस्थापन प्रणाली’ (जीटीपीएमएस) तयार करण्यात आली आहे. त्याच्या सुटसुटीत, सोप्या व पारदर्शक कार्यपद्धतीचा पोलिसांना फायदा होणार आहे.

दरवर्षी शहर पोलिस दलातील विशिष्ट कार्यकाल पूर्ण केलेल्या पोलिसांच्या बदल्या केल्या जातात. काही पोलिसांच्या बदल्या विनंतीवरून होतात. या बदल्या अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे व्हाव्यात, त्यामध्ये पारदर्शकता यावी, यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ.जालिंदर सुपेकर, पोलिस उपायुक्त (प्रशासन) स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) मितेष घट्टे यांच्या यांच्या टीमने एका कंपनीमार्फत ‘जीटीपीएमएस’ ही प्रणाली तयार केली आहे.

‘जीटीपीएमएस’द्वारे नियमित वार्षिक बदल्यांसाठी पात्र असलेल्यांची माहिती परिमंडळांकडून भरून घेण्यात आली आहे. त्यामध्ये बदलीसाठी पात्र असलेल्या पोलिसांनी पूर्वी कोणत्या पोलिस ठाण्यात काम केले आहे, त्यांचे पद, त्यांच्या कामाच्या स्वरुपासह वैयक्तीक माहिती प्रणालीमध्ये भरण्यात आली आहे. त्यामुळे कालावधी पूर्ण केलेल्या पोलिस ठाण्यात अथवा विभागात पुन्हा बदली होणार नाही, मात्र त्यांनी दिलेल्या पाच पर्यायांपैकी एका ठिकाणी त्यांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच, विनंती बदलीमध्ये देखील कारणाची माहिती भरून दिल्यानंतर समिती त्याचा विचार करून पुढील निर्णय घेऊ शकणार आहे. यावर्षी कार्यकाळ पूर्ण केलेल्या १३०० पोलिसांच्या नियमित बदल्या केल्या जाणार आहेत. तर साडेसातशे पोलिसांनी विनंती बदल्यासाठी अर्ज केला आहे. या सर्व बदल्या संबंधित प्रणालीद्वारे केल्या जाणार आहेत. पददनिहाय व कामाच्या पद्धतीनुसार बदल्यांच्या नोंदी होणार असल्यामुळे कामातील अडचणी देखील दूर करण्यास यामुळे मदत होणार आहे.

असे होणार पोलिसांना फायदे

  • प्रणालीमुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येणार

  • प्रक्रिया साधी, सोपी व सुटसुटीत होणार

  • पोलिसांची होणारी धावपळ, वेळ

  • वाचणार

  • पर्याय उपलब्ध असल्याने गरजेच्या ठिकाणी बदली होणार

  • पोलिस ठाण्यांची गरज व मनुष्यबळाचाही होणार विचार

''पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘जीटीपीएमएस’या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्याशिवाय पोलिस ठाण्यांची तांत्रिक गरज पाहून अद्ययावत, कुशल मनुष्यबळाचा अभ्यास करून त्यांना मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. प्रणालीद्वारे बदल्यांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होईल.''

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Deputy Mayor : मुंबईच्या उपमहापौरपदासाठी महायुतीकडून कुणाचं नाव? अमित साटम यांनी केली घोषणा; वाचा...

Who Is Ritu Tawade: २९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर, कोण आहेत रितू तावडे?

ZP Elections 2026 Voting Live Update : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क, अजितदादांची ‘ती’ परंपरा जपली

Samsung Galaxy S25+ प्रीमियम स्मार्टफोनवर चक्क 28 हजारचा डिस्काउंट, पाहा कुठे सुरुय ही बंपर ऑफर

SCROLL FOR NEXT