पुणे

पुणेकर गुजराती भाषक असल्याचा सार्थ अभिमान

CD

मार्केट यार्ड, ता. २४ : ‘‘पिढ्यान्‌पिढ्या पुण्यात राहत असल्याने आम्ही कधी पक्के पुणेकर झालो, हे कळलेच नाही. गुजरातीबरोबरच मराठी भाषेवरही आमचे तितकेच प्रभुत्व आहे. त्यामुळे पुणेकर गुजराती भाषक असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,’’ असे प्रतिपादन दी पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांनी केले.

मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात गुजराती भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गुजराती भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करण्यासह विद्यार्थ्यांना भाषिक व सांस्कृतिक परंपरेशी जोडण्यासाठी गरबा, काव्यवाचन आणि गुजराती निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी पारंपरिक गरब्यासह काव्य आणि निबंधातून आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष जनक शाह, सहसचिव दिलीप जगड, विनोद देढिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, प्रमुख अतिथी अमिताबेन शाह आणि वर्षाबेन परमार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन कला मंडळप्रमुख डॉ. अर्चना पंडित, चेतना आडतीया, शैलजा गुजराथी आणि हार्दिका पटेल यांनी केले.

डॉ. शहा म्हणाले, ‘‘मातृभाषेचे जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.’’ मंडळाचे उपाध्यक्ष जनक शाह यांनी भाषाशुद्धीचे महत्त्व अधोरेखित केले.
स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
-------
भाऊ रंगारी रस्ता ः हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात गुजराती भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT