गुरव समाजाचा
वडूजला आज मेळावा
वडूज, ता. २५ : खटाव तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने उद्या (बुधवारी) येथील भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपात जिल्हास्तरीय मेळावा आयोजिल्याची माहिती तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव गुरव यांनी दिली.
या मेळाव्यात श्रावणी व मौजीबंधन सोहळा होणार आहे. सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर वधूवर मेळावा आदी कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, शंकरराव गुरव, पांडुरंग गुरव, बालाजी गुरव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, प्रकाश गुरव, डॉ. अर्चना गुरव, बाळासाहेब गुरव, विजयकुमार पोरे, रविकुमार क्षीरसागर, प्रतापराव गुरव, अर्चना गुरव, सुरक्षा साखरे, वेताळभक्त दादा महाराज, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, माजी उपसभापती नाना पुजारी, पंचायत समिती सदस्य महेश वाघ, डॉ. सुजित ननावरे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष विक्रम ननावरे, विजय गुरव, किशोर यादव, अमोल गुरव तसेच शोभा गुरव, सई ननावरे, मनीषा गुरव, यामिनी गुरव यांनी केले आहे.
---------------