पुणे, ता. ३ ः संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची पाठशुद्ध प्रत ज्या दिवशी तयार केली, तो दिवस महाराष्ट्राने राज्य ग्रंथ दिन म्हणून गौरवावा, म्हणून प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. मुकुंद दातार यांनी केले.
सकाळ प्रकाशनाने ज्ञानेश्वरीचा आजच्या मराठी भाषेतील ओवीबद्ध अनुवाद ‘ज्ञानाई’ ग्रंथरूपाने नुकताच प्रकाशित केला आहे. त्या अनुषंगाने सकाळ प्रकाशन आणि गीता धर्म मंडळातर्फे ज्ञानेश्वरी परिष्करण दिन म्हणजेच ज्ञानेश्वरी जयंती दिनानिमित्त एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. दातार बोलत होते. तत्पूर्वी ‘ज्ञानेश्वरीचे महत्त्व आणि ज्ञानाईचे औचित्य’ या विषयावर प्रसिद्ध अभ्यासक अभय टिळक म्हणाले, ‘‘गीता व ज्ञानेश्वरी हे ग्रंथ जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची कवाडे उघडली आणि आजच्या पिढीसाठी हे काम ज्ञानाईच्या माध्यमातून होत आहे.’’
ज्ञानाईच्या अनुवादक मंजुश्री गोखले यांनी अनुवाद करताना त्यांना आलेले अनुभव मांडले. सकाळ लिट फेस्ट पूर्वरंग अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऐश्वर्या कुमठेकर यांनी केले. तेजस्विनी गांधी यांनी सूत्रसंचालन केले.
-----------------
‘ज्ञानाई’ विषयी...
ज्ञानेश्वरीचा आजच्या मराठीतील ओवीबद्ध अनुवाद ‘ज्ञानाई’ या पुठ्ठा बांधणीच्या ग्रंथाची किंमत ९९९ रुपये आहे. वाचकांना हा ग्रंथ सकाळ मुख्य कार्यालयात आणि महाराष्ट्रातील पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी वाचकांनी www.sakalpublications.com या वेबसाईटवरून लाॅग इन करावे. अधिक माहितीसाठी संपर्क- ८८८८८ ४९०५०
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.