पुणे

बहिस्थ विद्यार्थी केंद्राचे दहावी, बारावीत यश

CD

हडपसर, ता. १० : येथील प्रथम शिक्षण मंडळाच्या बहिस्थ केंद्राचा दहावी-बारावीचा ९१ टक्के निकाल लागला आहे.‌ ठिकठिकाणी काम करून वर्गाबाहेर अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक होत आहे.
प्रथम संस्था गेली २० वर्षे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी हडपसर, रामटेकडी, ग्रामीण भागात मुळशी, भिगवण व मावळ येथे प्रामुख्याने सहा ते १४ वयोगटातील मुलांसाठी वस्ती वाचनालय, अप्रगत मुलांचे वर्ग व १४ ते ३५ वयोगटातील अर्धशिक्षित व शिक्षणापासून वंचित महिला व मुलींना दहावी आणि बारावीचे शिक्षण देण्यासाठी बहिस्थ विद्यार्थी मार्गदर्शन व शिक्षण केंद्र चालवते.
यंदा संस्थेतील एकूण ६५ विद्यार्थी १७ नंबर फॉर्म भरून दहावी व बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील ५९ मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये अमृतेश कुलकर्णी (८०), तेजस पाटोळे (६४) यांनी चांगले यश प्राप्त केले. शिक्षण सोडल्यानंतर मोनिका कांबळे यांनी संसार सांभाळत तब्बल २४, तर रूपाली बेले यांनी २० वर्षांनी दहावी उत्तीर्ण होण्यात यश मिळविले असून आश्‍विनी पराठे, शुभांगी कांबळे यांनी या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
यातील बहुतांश विद्यार्थी गरीब व निराधार आहेत. मॉल, कंपनी, कापड दुकान, गॅरेज, भाजी विक्री आदी विविध ठिकाणी ते कामे करतात. संस्थेने त्यांना सकाळी १० ते चार या वेळेत अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिली असून परिस्थितीवर मात करत स्वाभिमानाने जगण्याची धडपड व काही तरी करून दाखवण्याची जिद्द मनात ठेवून ही मुले शिक्षण घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT