नाणेघाट  sakal
पुणे

उपद्रव शुल्क आकारणी नाणेघाटामध्ये बंद : शिंदे

वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघर यांच्या वतीने सन २०१९ मध्ये उपद्रव शुल्क आकारण्यात सुरवात केली होती.

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जुन्नर तालुक्यात पर्यटनबंदी करण्यात आली असून, नाणेघाट येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्यावतीने आकारण्यात येणारे उपद्रव शुल्क बंद करण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात असणाऱ्या नाणेघाट येथे दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. आलेल्या पर्यटकांकडून कचरा, पाण्याच्या बाटल्या परिसरात टाकून निसर्गाचे विद्रुपीकरण केले जाते. यावर उपाय व स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, या हेतूने वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघर यांच्या वतीने सन २०१९ मध्ये उपद्रव शुल्क आकारण्यात सुरवात केली होती.

सध्या कोरोना काळात पर्यटनस्थळावर गर्दी करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनबंदीचा आदेश दिला आहे. त्यानुसार नाणेघाट येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने आकारण्यात येणारे शुल्क बंद केले आहे.

यापुढील काळात बेकायदा शुल्क आकारणी करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अजित शिंदे यांनी दिला आहे. तसेच, पर्यटकांनी बंदी असल्याने नाणेघाट येथे गर्दी करू नये, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT