सदाशिव मुरलीधर साळुंखे Sakal
पुणे

हवेली : MPSC परीक्षेत सदाशिव राज्यात दुसरा; गावाकडून कौतुक

परिस्थितीअभावी तो महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकला नाही.

कृष्णकांत कोबल

मांजरी खुर्द : परिस्थितीअभावी तो महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाची परिक्षा देण्याचे ठरविले. जिद्दीने केलेले प्रयत्न आणि अभ्यासातील सातत्य यामुळे कोलवडी (ता. हवेली) येथील सदाशिव मुरलीधर साळुंखे या तरूणाने आयोगाच्या या परिक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. परिस्थितीशी झगडत अशी परिक्षा देऊन यश मिळवलेल्या या तरूणाचे गावाकडून कौतुक होत आहे.

यशवंतचे माजी संचालक मिलापचंद गायकवाड, हवेली तालुका तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष विकास गायकवाड, शाळा समितीचे अध्यक्ष दिलीप गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास गायकवाड, शरद सोसायटीचे माजी चेअरमन विश्वास गायकवाड, माजी सरपंच सतिष गायकवाड, माजी उपसरपंच बाळासाहेब भाडळे, अजित गायकवाड, श्रीकांत भोर, रमेव मदने, सचिन गायकवाड, विनायक गायकवाड, धनाजी साळुंखे आदी ग्रामस्थांनी सदाशिवची भेट घेऊन त्याचे या यशाबद्दल कौतुक केले.

"वडिलांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी मला तालमीत पाठवले. लहानपणापासून मी मोठं यश मिळवायची जिद्द ठेवली होती. त्यामुळे शाळेतही मी कायम पहिला क्रमांक मिळवायचो. कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र केसरी मिळवावा, अशी वडिलांची इच्छा होती. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खर्च परवडत नव्हता. खेळाची आवड होती म्हणून ज्युदोकडे वळलो. त्यात आठरा वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळलो. पहिल्यांदाच स्पोर्टमधून लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळविले.

दरम्यान, वडिलांना कर्करोगाच्या दूर्धर आजाराने गाठले. त्यांचा दवाखाना, नंतर मृत्यू अशाही परिस्थितीत हे यश मिळाले. हे यश पाहण्यासाठी वडील नाहीत याची खंत आहे. मात्र, मला मोठं होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीत आहे याचा आनंदही होत आहे. सध्या राज्यसेवा पदासाठीच्या परिक्षेचा मी अभ्यास करीत आहे. त्यामध्येही मी यशस्वी होईल, अशी खात्री आहे. कोलवडी ग्रामस्थांकडूध होत असलेल्या कौतुकाने प्रोत्साहन मिळत आहे.' अशी भावना सदाशिव साळुंखे याने यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT