पुणे

हवेलीत महिलांना पाणीटंचाईची चिंता

CD

शरद पाबळे : सकाळ वृत्तसेवा
केसनंद, ता. १५ : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यात सध्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पुढील काही दिवस अधिक कठीण जाऊ शकतात, अशी काळजीची भावना महिला वर्गाकडून व्यक्त होत आहे.


हवेलीतील टंचाई निवारणासाठी सध्या दोन गावांत आणि पाच वाड्यांमध्ये एकूण सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील वर्षीही याच कालावधीत सात टँकर कार्यरत होते.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणीटंचाई निवारणासाठी सध्या हवेली तालुक्यात आर्वी (गावठाण व तानाजीनगर) व कल्याण (गावठाण, शिवतारवाडी, मोरदरी) ही दोन गावे तसेच कोंढणपूरचे अवसरेनगर, आणि घेरा सिंहगडचे आतकरवाडी, पेठ, भिलारवाडी, धनगरवाड्या, या पाच वाड्या-वस्त्यांवर सात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईमुळे तालुक्यात खेड शिवापूर व टिळेकर वाडी ही दोन गावे तर कदमवाकवस्ती (वॉर्ड क्रमांक एक, कवडी माळवाडी) आणि घेरा सिंहगड (थोपटेवाडी) या दोन वाड्यांकडून टँकरची अतिरिक्त मागणी आहे.

पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी हवेली-शिरूरचे आमदार माऊली कटके तसेच खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली हवेली पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीत हवेली तालुक्यातील पाणीटंचाई व त्यावरील उपायोजनांचा आढावा घेण्यात आला होता.

२७ मोठ्या योजना कार्यरत
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाच कोटी रुपयांवरील २७ मोठ्या योजना कार्यरत असून या योजना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले. तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ५० योजना राबविण्यात येत असून त्यापैकी २३ योजना पूर्ण झाल्या आहेत, तर २७ योजना प्रगतीपथावर आहेत.

दृष्टिक्षेपात टँकर
सुरू असलेले...... ७
मागील वर्षी...... ७
प्रस्तावित ...... ०


टंचाई निवारणासाठीचा आराखडा
नळपाणी योजना दुरुस्ती
स्रोत बळकटीकरण
विहीर अधिग्रहण
टँकरद्वारे पाणीपुरवठा

हवेली तालुक्यातील प्रत्येक गावास पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी सूक्ष्म नियोजन करून कोणत्याही गावात तसेच वाडीत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ नये, याकरिता सर्व संबंधित ग्रामपंचायती व पाणीपुरवठा विभागास सूचना दिल्या आहेत. आवश्यक व योग्य त्या उपाययोजना राबवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे.
- शेखर शेलार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, हवेली.


सध्या टॅंकर सुरू असलेली गावे : गावे २, वाड्या ५
टॅंकर मागणी असलेली गावे : २ गावे, २ वाड्या

टंचाई निवारणासाठी मंजूर उपाययोजना : (१ ऑक्टो २०२५ ते ३० जून २०२६)
१. नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती : ३ गावे ४ वाड्या - ७
२. स्रोत बळकटीकरण करणे : ५ गावे ७ वाड्या - १२
३. विहीर अधिग्रहण करणे : २ गावे ५ वाड्या - ७
४. टँकरने पाणी पुरवठा करणे : २ गावे ५ वाड्या - ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT