Health-Issue 
पुणे

#HealthIssue इनोव्हेशन’वर वर्षभरात एक रुपयाही खर्च नाही

योगिराज प्रभुणे

पुणे - आधुनिक काळातील ‘आयटी हब’, ‘इनोव्हेशन सेंटर’ अशी बिरुदावली मिरवणारी पुणे महापालिका आरोग्य क्षेत्रात एकही नावीन्यपूर्ण प्रयोग करू शकली नसल्याचे ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ने (एनएचएम) अधोरेखित केले आहे. ‘इनोव्हेशन’ या लेखाशीर्षावरील एक रुपयाही गेल्या वर्षभरात महापालिकेने खर्च केला नाही. सर्वांत कमी निधी खर्च झाल्याबाबत कानउघाडणी करणारे पत्रदेखील ‘एनएचएम’ने महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.

पुणेकरांना आरोग्याच्या पायाभूत सुविधा मिळाव्या, त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्‍टर आणि वैद्यकीय सेवेसाठी कुशल मनुष्यबळ घेता यावे, प्रशिक्षण, क्षमतावृद्धीसाठी ‘एनएचएम’ने महापालिकेला १० कोटी १९ लाख ५० हजार रुपये मंजूर केले होते. त्यापैकी सप्टेंबरपर्यंत जेमतेम २ कोटी ४६ लाख ९४ हजार रुपये म्हणजे मंजूर केलेल्या निधीच्या २४.२२ टक्के खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील लोकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी दिलेल्या निधीचा वापर होत नसल्याचे पत्र महापालिकेला पाठविले आहे. या बाबत आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंचाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. 

‘इनोव्हेशन’चा अभाव
पुणे महापालिकेने गेल्या वर्षभरात आरोग्य क्षेत्रात ‘इनोव्हेशन’चा कोणताच प्रयोग केला नाही. त्यामुळे ‘इनोव्हेशन’ या लेखाशिर्षाखाली ‘एनएचएम’ने दिलेले ७५ लाख ४६ हजार रुपयांपैकी एकही रुपया खर्च झाल्याचे दिसत नाही. पुणे हे ‘आयटी हब’ आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा उगम या शहरातून होतो. पण असे असतानाही महापालिकेने कोणाशीही समन्वय साधून पुणेकरांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

निधी देण्याच्या उद्देशाला हरताळ 
केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्यासंबंधी विविध योजना राबविल्या जातात. ‘एनएचएम’ राज्य आरोग्य सोसायटीतर्फे पुणे महापालिकेला निधी उपलब्ध करून देते. पुणेकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शहरातील दवाखान्याचा दर्जा उंचावला पाहिजे, तसेच आरोग्याशी संबंधित सेवासुविधा नागरिकांना देणे हे हा निधी देण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. पण या उद्देशालाच महापालिकेने हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. कारण मिळालेल्या निधीच्या पन्नास टक्केही निधी खर्च झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Commission : कन्फर्म तिकीट होतं, तरी संपूर्ण प्रवास उभ्याने; अखेर रेल्वेलाच मोजावी लागली मोठी किंमत, नेमकं काय घडलं?

Child Drowns in River : वडील पोहत असताना पोटचा गोळा बुडाला, कोल्हापुरातील शिंगणापूर बंधाऱ्यावरील घटना

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात 'या' मालिकेसाठी संधी मिळणार! निवड समितीच्या मिटिंगला नवा T20I कर्णधारही राहणार हजर

IMD Monsoon Update : देवभूमीत आनंदघन अवतरले, महाराष्ट्रासाठीही गूड न्यूज! अरबी समुद्रातील अडथळे दूर, मॉन्सून कोकणात कधी धडकणार?

Kolhapur Accident News : हळू येतो म्हणाले, पण ‘ते’आलेच नाहीत!, उत्तुर घाटात झालेल्या अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं; चातकासारखी वाट पाहणाऱ्या भावाचा आक्रोश

SCROLL FOR NEXT