House Collapsed Sakal
पुणे

मुसळधार पावसाने घर कोसळले, जीवीत हानी नाही.

बाहेर आवाज आल्याने बाहेर पडले आणि क्षणात डोळ्यासमोर संसार उध्वस्त झाला.

सकाळ वृत्तसेवा

आपटाळे : गोकुळाष्टमीचा उपवास असल्याने दोघेही रात्री एकत्र जेवायला बसलो. बाहेर मुसळधार पाऊस अन सोसाट्याचा वारा सुरूच होता अन अचानक सळसळ असा आवाज झाला, आवाज कसला येतोय हे पाहायला बाहेर पडले तर क्षणातच घराच्या साऱ्या भिंती कोसळायला लागल्या अन पाहताच क्षणी उघड्या डोळ्यासमोर सारा संसार हा उध्वस्त झाला. अशी दुर्दैवी वेळ निसर्गाच्या प्रकोपाने व मुसळधार पावसाच्या रूपाने आमच्यावर आली मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी व्यथा रत्ना रमेश पानसरे यांनी मांडली.

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील घाटघर येथे गुरुवार ता 18 रोजी रात्री 11 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत येथील रमेश जयराम पानसरे व रत्ना रमेश पानसरे यांच्या राहत्या घराचे पूर्णतः नुकसान झाल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. मुसळधार पावसामुळे रमेश पानसरे यांच्या 14 फूट रुंदी व 40 फूट लांबी असलेल्या घराच्या भिंती पडल्याने घराचे पूर्णतः नुकसान झाले.

रमेश पानसरे यांच्या अंगावर लोखंडी अँगल व पत्रे पडल्याने त्यांना दुखापत झाली मात्र त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते या घटनेतून सुखरूप बचावले. तर घराचे पत्रे, जीवनावश्यक सर्व साहित्य, धान्य, टीव्ही, फ्रीज यासह घरातील सगळ्या साहित्याचे नुकसान झाले आहे. या घटनेने जवळपास 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पानसरे यांनी व्यक्त केला. शनिवार व रविवार सुट्ट्यांमुळे नाणेघाट येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्याकरिता जवळपास दहा हजार रुपयांचा केलेला बाजारहाट देखील पूर्णतः वाया गेल्याची खंत पानसरे यांनी व्यक्त केली. दरम्यान ग्रामसेवक रामदास जोशी यांनी घटनास्थळी भेट दिली तर तलाठी राजाराम केदारी यांनी घटनेचा पंचनामा केला. प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी रमेश पानसरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

Mahayuti Politics: महायुतीचा मास्टरस्ट्रोक! बंडखोरांना मोठी ऑफर; भाजप प्रदेशाध्यक्षांनी नेमकं कोणतं आमिष दाखवलं?

'दुप्पट परतावा’च्या आमिषाला पोलीसही बळी... कोल्हापुरातील रॅकेटची राज्यभर चर्चा; गुन्ह्याचा तपास करणारेच कसे अडकले?

SCROLL FOR NEXT