Bombay-High-Court sakal
पुणे

Pune News : प्राचार्यपदी मुदतवाढ मागणारी सुधाकर जाधवर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर आणखी ३ वर्षे मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

सकाळ डिजिटल टीम

धायरी - डोंगराळ भागात असलेल्या महाविद्यालयांसाठी सेवानिवृत्तीची पात्रता प्राचार्यांसाठी ६० वरून ६५ वर्षे केली आहे, या शासकीय अध्यादेशाचा आधार घेत वडगाव येथील चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण आणि क्रीडा मंडळाच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर आणखी ३ वर्षे मुदतवाढ मागण्याबाबतची प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

मुंबई उच्च न्यायालयातील दिवाणी अपीलीय क्षेत्राच्या न्यायाधिकरणातील रिट याचिका जी.एस. पटेल आणि नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली. जाधवर यांनी १ जून २०२३ रोजी याचिका दाखल केली होती. शिवछत्रपती कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ६२ व्या वर्षी, ६ जून रोजी ते सेवानिवृत्त होत होते.

त्याच्या आधी याचिका दाखल करून प्राचार्य पदी कायम राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण आणि क्रीडा मंडळ (सीवायडीपी) तसेच राज्य शासन आणि पुणे विद्यापीठ यांना त्यांनी प्रतिवादी केले होते.

संपूर्ण तालुका हवेली डोंगराळ भाग आहे. १८ जानेवारी २०२० च्या शासकीय अध्यादेशात डोंगराळ भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. शहरी भागात असलेल्या महाविद्यालयांसाठी आणि इतरांसाठी ही सूट नाही. प्रतिवादींनी बेकायदेशीरपणे आणि अध्यादेशाचा विचार न करता आपल्याला सेवानिवृत्तीचे वय ६५ पर्यंत वाढवण्याचा लाभ नाकारला आहे.

महाविद्यालय तंतोतंत डोंगराळ भागात येत असल्याने, कार्यप्रदर्शन पुनरावलोकनाचा प्रश्न नाही. महाविद्यालयात प्राचार्य म्हणून आपल्या सेवेत सातत्य ठेवण्याचा ठराव संमत करून त्याद्वारे वय ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, असा जाधवर यांचा दावा होता.न्यायालयाने योग्य आदेशाद्वारे प्रतिवादींना निर्देश देऊन शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली होती.

जाधवर यांच्या कामगिरीबद्दल विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ते इतर शैक्षणिक संस्था चालवत आहेत. प्राचार्यांच्या कामाव्यतिरिक्त इतर कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल आणि इतर तक्रारींबाबत तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी. जाधवर यांनी भौतिक तथ्ये दडपली आहेत. न्यायालयासमोर ते स्वच्छ हेतूने आलेले नाहीत, असे प्रतिवादींचे म्हणणे होते.

भौगोलिक स्थितीच्या संदर्भात प्रतिवादींनी असे म्हटले आहे की वडगाव येथे असलेले  महाविद्यालय शहरी भागात आहे. जाधवर यांना अनुकूल होईल अशा पद्धतीने भूगोल बदलू शकत नाही. जाधवर यांचा संपूर्ण प्रयत्‍न असे म्हणण्‍याचा आहे की पफाॅर्मन्स रिव्ह्यू अजिबात नसावा.‌

जाधवर यांनी राज्य प्राधिकरणाचे कोणतेही प्रतिनिधित्व केले नाही आणि सीवायडीपी महाविद्यालयानेही नाही. किंवा राज्य सरकारच्या मान्यतेने कामगिरी पुनरावलोकन समितीचा (पफाॅर्मन्स रिव्ह्यू कमिटी) निर्णय होईपर्यंत विद्यापीठ ६५ वर्षे वयापर्यंत जाधवर यांना पुढे मुदत देऊ शकत नाही. पफाॅर्मन्स रिव्ह्यू अनिवार्य आहे आणि २०१६ च्या अध्यादेशाद्वारे ही अट काढून टाकण्यात आलेली नाही.

प्रतिवादी क्रमांक १ ते ३ साठी एस. देशमुख यांनी ४ साठी एन.सी. वाळिंबे व ५ साठी राजेंद्र अनभुले यांनी काम पाहिले. याचिकाकर्त्यांकडून तेजस दंडे, भरत गढवी यांनी काम पाहिले. दरम्यान, प्रा. सुधाकर जाधवर यांच्या स्वत:च्या महाविद्यालयातही प्राचार्य पदावर गदा येणार असून पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवरील  सदस्यत्वही संपुष्टात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT