rajgurunagar.jpg 
पुणे

राजगुरूनगर नगरपरिषदेला उच्च न्यायालयाचा दणका

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर (पुणे) : येथील पुणे- नाशिक महामार्गालगतच्या एका जागेमध्ये उभी राहत असलेली इमारत नियमबाह्यपणे बांधली जात असल्याच्या तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या राजगुरूनगर नगरपरिषदेला उच्च न्यायालयाने फटकारले आहे. संबंधित तक्रारीची सुनावणी घेऊन आठ आठवड्यांत प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेड पोलिस ठाण्याशेजारी राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीतील गट क्र. ३१४/१ आणि ३१४/३ मध्ये अगस्ती डेव्हलपर्स या विकसकाकडून चार मजली इमारत उभारली जात आहे. काम जवळपास पूर्ण होत आले आहे. मात्र, मंजूर योजनेऐवजी वेगळे आणि अधिक काम केले जात आहे. प्रत्यक्षात १२ गुंठे क्षेत्र बिगरशेती केलेले असताना २५ गुंठ्यात बांधकाम परवानगी मिळवून बांधकाम करण्यात येत आहे, अशी तक्रार सुभाष कानवडे यांनी नगरपरिषदेकडे फेब्रुवारी महिन्यात केली होती. त्यानंतरही त्यांनी नगरपरिषदेला स्मरणपत्रे दिली व पुन्हा तक्रारही केली. पण, नगरपरिषदेने दखल घेतली नाही. 

त्यामुळे कानवडे यांनी उच्च न्यायालयात २५ सप्टेंबर रोजी रिट याचिका दाखल केली व अनधिकृत बांधकाम पाडण्याचे निर्देश देण्याची विनंती केली. तिच्यावर २९ सप्टेंबर व १ ऑक्टोबरला सुनावणी झाली आणि न्यायालयाने नगरपरिषदेला तक्रारीची सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले, अशी माहिती तक्रारदाराच्यावतीने वकील म्हणून काम पाहणारे अॅड अक्षय पेटकर आणि त्यांचे सहायक अॅड. नीलेश आंधळे यांनी दिली. पहिली सुनावणी १८ ऑक्टोबरला घ्यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेत अजून काही विनंत्या केल्या आहेत. त्यानुसार यातील काही बांधकाम हुतात्मा राजगुरू स्मारकाच्याही जागेत झाल्याने ते हटवावे, अशी विनंती केली आहे. तसेच, यातील काही बांधकाम महामार्गाच्या जागेत झाले असून ते हटवावे, अशीही विनंती केली आहे. 
दरम्यान, या बांधकामासाठी मोजणी केलेले प्रकरण संबंधित खात्याकडे सापडत नाही. एकाच मोजणी रजिस्टर नंबरवर मोजणीचे ३ वेगळे नकाशे केल्याचा दावा तक्रादाराकडून करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs DC Live: दिल्लीच्या १५ धावांत ४ विकेट्स! सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल, गुरजपनीतचा पहिल्याच चेंडूवर विक्रम; Video

Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

Sanju Samson : सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात, प्लीज प्रत्येक मॅचला या...! विक्रमी शतकानंतर संजूने कोणाला केली विनंती? भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव...

IAS Sandeep Rathod News: तुळशीचे भूमिपुत्र आयएएस संदीप राठोड केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त; माहूर तालुक्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Chh. Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर स्विफ्ट कारची ट्रॅक्टरला भीषण धडक; महिलेचा हात फ्रॅक्चर, एक जखमी

SCROLL FOR NEXT