Pune Temperature News sakal
पुणे

Pune Temperature News : धूलिवंदनाला उच्चांकी तापमान ; पाऱ्याची सरासरी २.७ अंश सेल्सिअसने उसळी

होळीनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. धूलिवंदनाच्या दिवशी शिवाजीनगर येथील वेधशाळेत ३८.९ अंश सेल्सिअस इतके आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदले गेले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : होळीनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. धूलिवंदनाच्या दिवशी शिवाजीनगर येथील वेधशाळेत ३८.९ अंश सेल्सिअस इतके आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदले गेले. राज्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद अकोला येथे झाली.

होळीच्या दिवशी म्हणजे शनिवारी (ता. २४) ३७.७ अंश सेल्सिअस तापमान होते. होळीनंतर उन्हाचा चटका वाढतो. त्यामुळे धूलिवंदनाच्या दिवशी पाऱ्याने सरासरीपेक्षा २.७ अंश सेल्सिअसने उसळी घेतली. गेल्या वर्षी २९ मार्चला उच्चांकी म्हणजे ३५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यामुळे पुण्यात यंदा उन्हाचा चटका जास्त असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. पुण्यात मार्चमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक उच्चांकी तापमान १८९२ मध्ये नोंदविले गेले होते. त्या वर्षी ४२.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाचा पाऱ्याने उसळी मारली.

दिवसभर उन्हाचा चटका

शहरात सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका लागत होता. अशा भर उन्हात रंग खेळणाऱ्या तरुणाई रस्त्या-रस्त्यांवर दिसत होते. मात्र, दुपारनंतर उन्हाची तीव्रता आणखी वाढल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. कामानिमित्त बाहेर पडणारे पुणेकर टोपी, गॉगल घालून बाहेर पडत असल्याचे चित्र रस्त्यावर दिसत होते. शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी वाढली वाढली होती. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका कायम होता.

रात्रीचा उकाडा वाढला

शिवाजीनगर येथे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २.४ अंश सेल्सिअसने वाढून १८.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक किमान तापमान ठरले. त्यामुळे रात्रीचा उकाडा वाढला आहे. वडगाव शेरीमध्ये २४.९, मगरपट्टा येथे २४.२, कोरेगाव पार्कमध्ये २३.५, हडपसरमध्ये २२.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. शहर परिसरात एनडीए येथे सर्वांत कमी म्हणजे १८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे परिसरातील कमाल तापमान

(अंश सेल्सिअसमध्ये)

  • शिवाजीनगर ........ ३८.९

  • पाषाण .............. ३८.४

  • लोहगाव ............ ३८.६

  • मगरपट्टा ............. ३८.६

अंदाज असा

शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता कमाल तापमानाचा पारा वाढून ३८ अंश सेल्सिअस जाण्याची शक्यता शहरात शुक्रवारी दुपारनंतर (ता. २९) आकाश अंशतः ढगाळ राहाण्याची शक्यता असल्याने किमान तापमानात अंशतः वाढ अपेक्षित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: Jio IPO की Reliance चे शेअर्स? तुमच्याकडे 14,000 रुपये असतील तर कुठे गुंतवणं फायद्याचं? तज्ज्ञ काय सांगतात

'मैं मुस्लिम हूं, लेकिन नमाज नहीं पढ़ती' अभिनेत्री शबाना आजमी म्हणाल्या, 'माशाअल्लाह' म्हटलं की, जावेद अख्तर चिडतात'

वयाच्या ३९ व्या वर्षीही अविवाहित का आहे ललित प्रभाकर? सांगितलं लग्न न करण्याचं कारण, म्हणाला- मला...

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर करणार

IND vs NZ 1st T20I : खेळपट्टीत ट्विस्ट? वैभव सूर्यवंशीला Playing XI मध्ये खेळवण्याचा करावा लागेल विचार; गंभीर, अय्यर कठोर निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT