पुणे

कथेतून मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडते : परीट

CD

कथेतून मानवी जीवनाचे
यथार्थ दर्शन घडते : परीट
नगर तालुका : कथा या समाजाचा आरसा असून, त्यातून मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडते. सामाजिक, नैतिक, राजकीय व सांस्कृतिक परिवर्तन कथांमधून प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे माणसाला सामूहिक जगण्याची जाणीव होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार बाबा परीट यांनी केले.
चिचोंडी पाटील येथील प्रबोधन मंच व स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रबोधन व्याख्यानमाले’तील तिसरे पुष्प गुंफताना ‘कथा तुमच्या-आमच्या’ या विषयावर ते बोलत होते.
परीट म्हणाले, कथेमध्ये केवळ दुःख, अडचणी किंवा विनोद नसून समाजपरिवर्तनाचे संकेतही असले पाहिजेत. ग्रामीण जीवनाचा बदलता बाज अनेक कथाकार प्रभावीपणे मांडत आहेत. वरवरचे जीवन बदलले असले, तरी संस्कृती, परंपरा आणि नातीगोती अजूनही टिकून आहेत. या वास्तवाचे सकस चित्रण कथेतून घडले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ययाती फिसके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सृष्टी पाचारणे हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. आरिफ बेग यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: केवळ शब्दांचा खेळ न करता ठोस भूमिका मांडावी... विद्यानंद बापटांनी CM फडणवीसांच्या वक्तव्याचं विश्लेषण कसं केलं?

Phaltan ACB Trap: प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागणारा एजंट जाळ्यात; ५० हजार स्वीकारताना एसीबीची कारवाई

Marathi News Live Updates : जुन्नर तालुक्यात शालेय पोषण आहाराचा गंभीर प्रश्न; विद्यार्थ्यांना किडलेला, भुंगे लागलेला वाटाणा वितरीत

Ramesh Mhatre: डॉक्टरांवर हल्ला करणारे जामिनास पात्र नाहीत, शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Amravati Irwin Hospital: हाती रक्तपिशवी घेवून मातेचा वॉर्डात प्रवास इर्विनमधील आणखी एक धक्कादायक प्रकार; घटनेतून धडा नाहीच

SCROLL FOR NEXT