पुणे

देवदैठण

CD

शेतात आढळला मानवी सांगाडा
देवदैठण, ता. १० : उक्कडगाव (ता. श्रीगोंदे) शिवारात उसाच्या शेतात एका अनोळखी पुरुषाचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
शेतकरी दशरथ सोपान गोलांडे शनिवारी (ता. ८) आपल्या उसाच्या शेतात गवत काढणीचे काम करीत असताना त्यांना सांगाडा आढळून आला. त्यांनी तत्काळ बेलवंडी पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या व्यक्तीच्या मृत्यूला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उसाची बांधणी झाल्यानंतर कॅनॉल व डोंगराच्या बाजूला असलेला हा परिसर तुलनेने निर्जन आहे. त्यामुळे हा सांगाडा उसाच्या शेतात नेमका कसा आला, तसेच या व्यक्तीचा मृत्यू घातपातामुळे झाला की अपघातामुळे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. सांगाड्याजवळ एक फुलबाह्यांचा आकाशी रंगाचा शर्ट, विटकरी रंगाची अंडरवेअर, पांढरे बनियन, तसेच विटकरी रंगाची चप्पल आढळून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: टीम इंडियाला पुन्हा दुखापतीचा फटका? कुलदीपने का केली नाही Warm-up मॅचच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी, नेमकं काय घडलं?

परदेशातलं सुख सोडून भारतात का परतली मृणाल दुसानिस? मालिका नाही तर 'या' दोन गोष्टी ठरल्या कारण; म्हणाली-

Narayangaon Crime : श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र गोळीबार प्रकरणातील एक जणाला अटक; अटक आरोपी कुविख्यात गुन्हेगार

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

SCROLL FOR NEXT