Sharad Pawar 
पुणे

...तर कोल्हापूरच्या निकालानं स्पष्ट केलंय निकाल काय असेल? - शरद पवार

"सत्ता येते आणि जाते त्यामुळं याची चिंता करण्याची गरज नाही. पण काही लोक उगाचच चिंताग्रस्त होतात"

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. विरोधकांकडून वारंवार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच जर खरंच निवडणुका लागल्या तर निकाल काय असेल हे कोल्हापूरच्या निकालानं स्पष्ट केलंय, असं पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते.

पवार म्हणाले, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या कायम दिल्या जात आहेत. पण यामुळं काहीही फरक पडणार नाही. जर निवडणुकांची स्थिती निर्माण झाली तर निकाल काय असेल हे कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीनं दाखवून दिलं आहे.

सत्ता येते आणि जाते त्यामुळं याची चिंता करण्याची गरज नाही. पण काही लोक उगाचच चिंताग्रस्त होतात. मी त्यांना दोष देणार नाही. कारण राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असा दावा करण्यात आला होता. पण हे होऊ शकलं नाही आणि यामुळंच ते चिंताग्रस्त झाले आहेत, अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील 'आरएसएस स्मृती मंदिरा'बाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

SCROLL FOR NEXT