sspu sakal
पुणे

पुणे : राष्ट्र उभारणीची प्रेरणा ‘आयात’ नसावी

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्राच्या उभारणीची प्रेरणा ही त्याच्या संस्कृतीतूनच मिळते. ती परदेशातून आयात करून चाल नाही, असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SSPU) ‘आझादी का अमृतमहोत्सवा’ निमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानाला कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, विभागप्रमुख प्रा. मंगेश कुलकर्णी, रासेयोचे संचालक प्रा. प्रभाकर देसाई, प्रा.शांतीश्री पंडित आदी उपस्थित होते. ‘भारताची मूलभूत एकता’ या विषयावर खान यांनी विचार मांडले. ते म्हणाले,‘‘दीर्घकाळ ज्या राष्ट्राला नाकारलं गेले, ज्यावर पारतंत्र्य होते. त्या राष्ट्राच्या उत्थान्नाची प्रेरणा ही परदेशी विचारांनी प्रभावित असूच शकत नाही. भारतासाठीसुद्धा हा प्रेरणास्रोत इथल्या संस्कृती आणि परंपरांच्या मुळाशी दडलेला आहे.’’ डॉ. करमळकर यांनी विद्यापीठाच्या आजवरच्या उपलब्धींची माहिती दिली.

भारतीय सभ्यतेची परिभाषा ‘आत्मा’

जगभरातील सभ्यतांची ओळख ही त्यांची भाषा, राहणीमान, उपासना पद्धत, प्रांत किंवा वर्णाच्या आधारे करता येईल. मात्र, भारतीय सभ्यतेच्या बाबतीत हे मापदंड लावता येणार नाही. कारण, इथे वेगवेगळी उपासना पद्धत, भाषा, राहणीमान, वर्ण सर्वच काही आहे. एका मापदंडात इथली सभ्यतेची परिभाषा करता येणार नाही. भारतीय सभ्यतेच्या परिभाषा ही केवळ व्यक्तींमधील ईश्वरीय अंश अर्थात आत्म्याच्या आधारे करता येते, असे खान यांनी सांगितले. सर्व समावेशक असलेला हा मापदंड केवळ मानवालाच नाही तर प्राणी आणि वनस्पतींनाही सामावून घेतो. वेदांनीही त्याच आधारे भारतीय सभ्यता परीभाषित केली आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

UP Farm Scheme: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! यूपीमध्ये कृषी यंत्रांवरील अनुदानासाठी आजपासून ऑनलाइन बुकिंग सुरू

IND VS ENG 2ND ODI: विराट कोहलीचा विश्वविक्रम! मोडला श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम; सचिन, धोनी यांनाही सोडले मागे

Shivalay Park: अवघ्या ५० रुपयांत करा भारताच्या नकाशावर '१२ ज्योतिर्लिंगांसह' प्रमुख शिवदर्शन! प्रयागराजमध्ये साकारला भव्य 'शिवालय पार्क'

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

SCROLL FOR NEXT