पुणे

इम्रान खान

CD

इम्रान खान यांच्या तपासणीवरून वाद
हृदयाची चाचणी न केल्याचा आरोप
इस्लामाबाद, ता. २४ (पीटीआय) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हृदयाची ‘सीटी कोरोनरी अँजिओग्राफी’ (सीटीए) न झाल्याने त्यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने पाकिस्तान सरकारवर टीका केली. आवश्यक सुविधा उपलब्ध असतानाही तपासणी करण्यात आली नसल्याचा आरोप पक्षाने केला असून, खान यांना तातडीने शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात हलविण्याची मागणी केली आहे.
७३ वर्षीय इम्रान खान यांना शुक्रवारी डोळ्यांच्या उपचारांसह काही वैद्यकीय तपासण्यांसाठी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी हृदयाची सीटीए तपासणी करण्याची शिफारस केली होती. मात्र, आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यानंतर तपासणी न करताच खान यांना अडियाला तुरुंगात परत नेण्यात आले. पीटीआयचे केंद्रीय माहिती सचिव शेख वकास अक्रम यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. एक ऑगस्ट रोजी पीएआयएमएसमधील हृदयरोग तज्ज्ञांनी रक्तदाबातील चढ-उतार, अस्वस्थता आणि हृदयाशी संबंधित गुंतागुंतीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सीटीएची शिफारस केली होती, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची दखल घेत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. तपासणी का झाली नाही आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, याचा समिती शोध घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी खान यांना शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात हलविण्याचे निर्देश दिले होते, असा दावाही पीटीआयने केला आहे. खान यांना ५ ऑगस्ट २०२३ रोजी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते अडियाला तुरुंगात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी यापूर्वीही पुरेशी वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचे आरोप केले आहेत.
सीटीए म्हणजे काय?
सीटीए सीटी कोरोनरी ॲजिओग्राफी ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांची तपासणी करण्याची आधुनिक पद्धत आहे.
सीटी स्कॅनच्या साहाय्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांची प्रतिमा घेतली जाते.
रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आहे का, हे पाहण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
हृदयाशी संबंधित गुंतागुंतीचा धोका असलेल्या रुग्णांमध्ये डॉक्टर ही तपासणी सुचवू शकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT