Pune PMPML News Esakal
पुणे

Pune PMPML News: पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; PMPML बस चालकाने गाड्यांना उडवलं

चालकावर ३०८ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. PMPML च्या चालकाने मद्यपान करून बस चालवल्याने भीषण अपघात झाला आहे.

पुण्यात पीएमपीएल बस चालकाने १० ते १५ गाड्यांना उडवलं आहे. सेनापती बापट रोड वरती हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वाहन चालकाशी वाद झाल्याने पीएमपीएल बस चालकाने या गाड्यांना उडवलं आहे. या पीएमपीएल बस चालकावर ३०८ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पीएमपीएल बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. निलेश सांवत असं या बस चालकाचे नाव आहे.

या पीएमपीएल बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाने दारूच्या नशेत बस उलटी चालवल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी आणि स्थानकांनी केला आहे. कृष्णा जाधव यांनी जीवाची परवा न करता या लोकांना वाचवले आहे. चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश सावंत असं बस चालकाचे नाव आहे.

एका चालकाशी वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले आहे. बस रिव्हर्स घेत चालकांने काही गाड्यांनी उडवलं आहे. ही घटना घडत असतानाच बसमधील प्रवाशांनी ओरडून मदत मागितली. पण, बस चालकाने बस थांबवली नाही. यामध्ये काही गाड्याचं नुकसान झालं आहे. तर काही लोक जखमी देखील झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT