Puja khedkar sakal
पुणे

Puja khedkar : मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ

शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याबाबत पौड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी शनिवारी (ता. २०) आदेश दिले.

पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी मुळशीतील शेतकरी पांडुरंग कोंडिबा पासलकर (वय ६५) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पौड पोलिसांनी पूजा खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप आणि अंगरक्षकासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी महाड परिसरातून अटक केली. या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने खेडकर यांच्या बाणेर येथील बंगल्याची झडती घेतली. यावेळी पोलिसांनी मनोरमा यांच्या बंगल्यातून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त केली होती. मनोरमा यांच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी (ता. २०) संपली. त्यांना आज पौड न्यायालयात हजर करण्यात आले. मनोरमा यांनी पोलिस कोठडीत चांगले जेवण मिळत नसल्याची तक्रार केली. परंतु पोलिसांनी त्यांचे आरोप फेटाळून लावले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बरडे यांनी मनोरमा यांच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (ता. २२) वाढ करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT