Corona Patients Sakal
पुणे

Corona Update : पुण्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ

पुणे जिल्ह्यात साडेसहा हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. आजघडीला जिल्ह्यातील ६ हजार ६१४ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. याउलट तीन हजार ५६७ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार ३५५ जण आहेत.

शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ जून २०२१ पासून सातत्याने कमी होऊ लागली होती. त्यानुसार जून आणि जुलै या दोन महिन्यात ही स्थिती कायम होती. त्यामुळे जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु आता हळूहळू ही संख्या वाढू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना रुग्णस्थितीचा अहवाल रोज प्रसिद्ध केला जातो. या अहवालात हे नवे चित्र दिसू लागले आहे. सद्यःस्थितीत शहर व जिल्ह्यात एकूण १० हजार १८१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यामध्ये पुणे शहरातील ३ हजार २१६, पिंपरी चिंचवडमधील ८९२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५ हजार ३३९, नगरपालिका हद्दीतील ६८५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ४९ रुग्णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT