पुणे

पिंपरीत एकाच दिवसात दोन बलात्कार, चार विनयभंगाचे गुन्हे दाखल

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात स्त्री अत्याचाराचे सात गंभीर गुन्हे एकाच दिवसात दाखल झाले. त्यामध्ये दोन बलात्कार तर चार विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे आयुक्तालयातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आयुक्तालय सुरु करून साडेअकरा महिन्यानंतरही गुन्हेगारीला आळा न बसता उलट ती वाढतच चालत असल्याची परिस्थिती आहे.

शहर व परिसरात (आयुक्तालय) 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील सात हे स्त्री अत्याचाराचे आहेत. सातपैकी तीन हिंजवडी, दोन चाकण तर पिंपरी आणि निगडी पोलिस ठाण्यावरील प्रत्येकी एक आहेत. बलात्काराचे गुन्हे हिंजवडी व निगडीतील आहेत. त्यातील हिंजवडीच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या तरुणीला गोव्याला पळवून नेऊन तेथे लैंगिक अत्याचार करण्यात आला. तर निगडीच्या घटनेतील तरुणीकडून सहा लाख 60 हजार रुपये रोख, दोन तोळे सोनसाखळी आणि तिची दुचाकीही आरोपींनी चोरून नेली. 

सातपैकी तीन गुन्ह्यांतील आरोपींना अद्याप अटक नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील 27 वर्षांच्या  तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून करण तळेगावकर (वय 23,रा.कात्रज,पुणे) याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही त्याने केला. एवढेच नाही तर तिच्याकडील साडेसहा लाख रुपयांची रोकड, दोन तोळे सोन्याची चेन व टू व्हिलर घेऊन तिची फसवणूक केली. तसेच तुझे आयुष्य बर्बाद करीन, अशी धमकीही दिली. या आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

तसेच बलात्काराच्या दुसऱ्या घटनेत हिंजवडीतील एका 25 वर्षीय तरुणीचे गोव्याला अपहरण करून तेथे तसेच पुण्यात कात्रजला दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून सोडून दिले. या गुन्ह्यात विवेक भोगील (रा.हडपसर, पुणे) याला अटक झाली असून, विष्णू व अतुल हे त्याचे साथीदार फरार झाले आहेत.

विनयभंगाच्या पाच गुन्ह्यांपैकी तीन हिंजवडी तर दोन चाकण पोलिस ठाण्यावरचे आहेत. पिंपरीच्या घटनेत 16 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱा रिक्षाचालक राजेश खिलारे (वय 19,रा. चिखली) याला पोलिसांनी पकडले आहे.

तो गेली दोन वर्षे या मुलीचा पाठलाग करीत होता.चाकणमधील पहिल्या प्रकारात 19 वर्षाच्या तरुणीचा गणेश बळे याने विनयभंग केला व तो पळून गेला. दुसऱ्या घटनेत एका 33 वर्षीय महिलेचा विक्रम आनंदकर (वय 30 रा.भोसे,ता.खेड,जि.पुणे) या रिक्षाचालकाने विनयभंग केला. तोही पळून गेला. मात्र, हिंजवडीच्या दोन्ही विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी पकडले गेले आहेत. योगेश गिरी (वय 28,रा.पुनावळे) आणि समीर इक्बाल अहमद (रा.केशवनगर,मुंढवा,पुणे) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT