पुणे

‘जलजीवन मिशन’च्या कामांची चौकशी करा

CD

भिगवण, ता. १९ : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेच्या इंदापूर तालुक्यातील कामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जा असल्याचा आरोप इंदापूर तालुका पश्चिम मंडल भाजपच्या वतीने केला आहे. या कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
या संदर्भात भाजपचे इंदापूर तालुका पश्चिम मंडळाचे अध्यक्ष तेजस देवकाते यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे. यामध्ये तालुक्यातील कळस, शेटफळगढे, निमसाखर, वडापुरी, मदनवाडी या गावांसह इतर कामांची तांत्रिक तपासणी, निविदा प्रक्रिया, मोजमाप पुस्तिका, गुणवत्ता अहवाल, दिलेली देयके आणि कामाची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
देवकाते म्हणाले, ‘‘महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरवण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्याला मोठा निधी दिला. मात्र, येथील कामांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. या सर्व कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT