पुणे

परकी चलनसाठा ७१६ अब्ज डॉलरवर

CD

परकी चलनसाठा
७१६ अब्ज डॉलरवर
मुंबई, ता. २१ः भारताचा परकी चलनसाठा १४ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात ९.९०५ अब्ज डॉलरनी वाढून ७१६.९० अब्ज डॉलरवर पोहोचला. त्याआधीच्या आठवड्यात हा साठा १४.१ अब्ज डॉलरनी वाढून ७०७ अब्ज डॉलर झाला होता, जी चालू आर्थिक वर्षातील सर्वोच्च पातळी होती. रिझर्व्ह बँकेने आज ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली. आरबीआयच्या एफसीएनआरबी ठेव योजनेतून आलेला निधी देशाच्या परकी चलनसाठ्यात दिसून येऊ लागल्याने ही अलीकडील वाढ झाली आहे.

परकीय चलन मालमत्तेमध्ये ७.२ अब्ज डॉलरची वाढ होऊन त्या ५८१.८५ अब्ज डॉलरवर पोहोचल्या; एकूण वाढीमध्ये याचा सर्वांत मोठा वाटा होता, तर सोन्याच्या साठ्यात २.६७ अब्ज डॉलरची वाढ होऊन तो १११.४१ अब्ज डॉलरवर पोहोचला. ''स्पेशल ड्रॉइंग राइट्समध्ये ५० लाख डॉलरची किरकोळ घट होऊन ते १८.७४० अब्ज डॉलरवर आले, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील भारताची राखीव स्थिती ५० लाख डॉलरनी वाढून ४.८९ अब्ज डॉलरवर पोहोचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला! दर नियंत्रणासाठी सरकारने उचलली कठोर पावलं; इथेनॉलमुळे खरंच भाव वाढले?

नवे-जुने मराठी चित्रपट आणि वेबसीरिज एकाच OTTवर; ‘८ वाजून १३ मिनिटे’ ते ‘कैरी’पर्यंत पाहा काय खास

Marathi News Live Updates : दिल्ली पोलिसांनी 'रॅपिड ॲक्शन फोर्स'च्या मदतीने जंतरमंतरवर जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले

कमाल अमरोहींच्या प्रेमात होत्या मधुबाला; लग्नासाठी दिलेली 'ही' ऑफर, म्हणाल्या- पत्नी मुलांना सोडून द्या, मी तुम्हाला...

Karad Crime : कऱ्हाडला महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून निर्घृण खून; खून केल्यानंतर संशयीत पोलिसात हजर

SCROLL FOR NEXT