Indians will get great relief about vaccines Important information given by Adar Poonawalla 
पुणे

भारतीयांना लसीबाबत मिळणार मोठा दिलासा! पुनावाला यांनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळवृत्तसेवा

पुणे : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसह मिळून कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टुट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी भारतीयांना लसीकरणाबाबत मोठा दिलासा मिळण्याचे संकेत दिले आहे. कोरोना लस एमर्जन्सी वापराकरिता डिसेंबर अखेरपर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

एका ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना त्यांनी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, ' SII ला कोरोना लसीचे लायसन डिसेंबर महिन्याअखेरीपर्यंत मिळेल अशी आशा आम्हाला आहे, पण त्यांच्या वापराची मंजूरी मात्र नंतरच मिळणार आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारातात जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण अभियान राबिवता येईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सिरम ''इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आणि ब्रिटन एस्ट्राझेनेकासोबत मिळून ही लस विकसित केली आहे. सिरम भारत सरकारसह इतर मार्केटसाठी देखील कोरोना लस उत्पादन करत आहे. केंद्र सरकार 2020 मध्ये जुलैपर्यंत 30 ते 40 टक्के डोस खरेदी करणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील 20 ते 30 टक्के लोकसंख्येला कोरोना लस उपलब्ध करायचे आहे. देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या 2021 मध्ये ऑक्टोबरपर्यंत कोरोना लस दिली जाणार आहे. त्यांनतर जनसामान्यांचे जनजीवन पुर्वीसारखे सुरळीत होईल.''

कोरोना लस बाबत आणखी माहिती देताना ते पुढे म्हणाले की, ''ही लस कोरोनापासून संरक्षण तर करते पण, कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यास उपयोगी ठरते की हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अद्याप कसलीही कल्पना आता आपल्याला नाही. जेव्हा कोरोनना लस देशातील 20 टक्के लोकसंख्येला मिळेल तेव्हाच लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल,  2020 मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता  त्यांनी व्यक्त केली आहे.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT