पुणे

शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी आज सोडत

CD

शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास
दौऱ्यासाठी आज सोडत
बुलडाणा : राज्य शासनाच्या ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पात्र शेतकऱ्यांना युरोप व चीन या देशांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी प्राप्त पात्र अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड बुधवारी (ता. २) सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.
या अभ्यास दौऱ्याचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ, सेंद्रिय शेती, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, निर्यातीच्या संधी तसेच कृषी बाजार व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. परदेशातील प्रगत कृषी पद्धतींचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
या योजनेसाठी प्राप्त झालेल्या पात्र अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी बुधवारी दुपारी १२ वाजता सोडत काढण्यात येणार आहे. सोडत प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच सोडतीचा निकाल आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी (प्रतीक्षा यादीसह) त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Latest Marathi News Live Update : तर आम्ही आणखी मोठा बॉम्ब फोडणार! मनोज जरांगे पाटील आक्रमक

आधी सौंदर्यस्पर्धांवर बंदी, आता मृत्युदंडाची शिक्षा! बुर्किना फासोच्या निर्णयांची का आहे जगभरात चर्चा?

SCROLL FOR NEXT