अमेरिकेसोबत
वाटाघाटी नाहीत
इराणची भूमिका; स्वसंरक्षणावर लक्ष केंद्रित
तेहरान, ता १६ (पीटीआय) : पश्चिम आशियामध्ये दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष तीव्र होत असताना, अमेरिकेसोबत पुन्हा वाटाघाटी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी स्पष्ट केले. इराणच्या ‘प्रेस टीव्ही’ या सरकारी प्रसारमाध्यमाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिकेच्या लष्करी कारवायांविरोधात सध्या स्वसंरक्षणावर लक्ष केंद्रित करत असल्याचे बघाई यांनी नमूद केले; तसेच या भागातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेसोबत झालेल्या सामंजस्य कराराला बांधील नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बघाई यांच्या म्हणण्यानुसार, १७ जून रोजी झालेल्या करारांतर्गत अमेरिकेने आपल्या वचनबद्धतेचे उल्लंघन सुरू ठेवल्यामुळे इराण वाटाघाटीसाठी पुढे येणार नाही.
इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांमुळे इराणला चर्चेसाठी भाग पाडले जाईल, या अमेरिकेच्या दाव्याला उत्तर देताना बघाई म्हणाले, ‘‘आमचा सध्या चर्चेचा कोणताही विचार नसून, आम्ही स्वतःच्या देशाच्या संरक्षणाला प्राधान्य दिले आहे. याबाबत अमेरिका काहीही दावे करीत असली तरीही आमची भूमिका अधिक स्पष्ट आहे.’’
कोट
सामंजस्य करार हा परस्पर वचनबद्धतेवर अवलंबून असतो. समोरील पक्षाने त्याचे उल्लंघन केल्यास आम्हीही आमची जबाबदारी पूर्ण करणार नाही.
-इस्माईल बघाई, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.