IT engineer suicide due to wifes torture 
पुणे

पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून आयटी इंजिनिअरची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पत्नी कपडे धुवायला सांगून घरातील कामे करून घेते, तसेच सततच्या त्रासाला कंटाळून एका आयटी इंजिनिअरने आत्महत्या केली. ही घटना मगरपट्टा परिसरात नुकतीच घडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप   

प्रणय मिलिंद खुटाळ (वय 29, रा. जिनिया बिल्डिंग, मगरपट्टा सिटी) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी मृताच्या आईने (वय 49, रा. लिंबोदा, ता. हतोद, जि. इंदोर) फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित पवार म्हणतात एकमत होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती-पत्नी नोकरी असून, त्यांना एक लहान मुलगाही आहे. पती प्रणय हा मगरपट्टा सिटी परिसरात आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करीत होता. तर, पत्नी ट्रॅक्‍टरच्या एका खासगी कंपनीत नोकरीस आहे.

शिवसेना पुन्हा भाजपसोबत; केले बाजूने मतदान

पत्नी घरात कपडे धुवायला सांगते. तिने मालमत्ता नावावर करण्याबाबत तगादा लावला होता. तसेच, पतीवर संशय घेऊन त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून प्रणयने बेडरूममधील पंख्याला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु मृताच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. ए. भाबड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT