पुणे

घोडेगाव आयटीआयमध्ये २१मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू

CD

घोडेगाव, ता. १९ : गोनवडी (ता. आंबेगाव) येथील क्रांतिवीर होनाजी भागुजी केंगले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २१ मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य विजय नार्वेकर यांनी केले आहे.
संस्थेत फॅशन डिझाइन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, फिटर आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स या नऊ ट्रेडसाठी प्रवेश उपलब्ध आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण (ट्रेडनुसार) ही पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.
अर्जाची सुविधा संस्थेतही उपलब्ध असून, सुट्ट्यांच्या दिवशीही कार्यालय सुरू राहील. अर्जाची प्रिंट आणि कागदपत्रांची छाननी संस्थेत करणे अनिवार्य आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, अधिक माहितीसाठी गणेश पापडे (७३५०५९०४१७) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT