Jackie Shroff arrives in Maval to console the housemaid 
पुणे

साध्या वेषात जॅकी श्रॉफ पोहोचला मावळात; घरकाम करणाऱ्या तरुणीचं केलं सांत्वन

भरत काळे

पवनानगर : नेते, अभिनेते आणि खेळाडू अशा वेगवेगळ्या सेलिब्रेटीचे मावळच्या जनतेशी नात घट्ट असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. प्रसंग सुखाचा असो की दु:खाचा या सेलिब्रेटींच येणे माणूसकीच दर्शन घडवून जाणार असतं. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते जॅकी श्रॅाफ यांनी पवन मावळातील कडधेत गावातील संजय ठाकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. संजय ठाकर यांच्या आई कै. तान्हाबाई ठाकर यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. श्रॅाफ यांना ही माहिती समजताच त्यांनी शुक्रवारी (ता.१२) ला सकाळी ठाकर कुटुंबाची घरी येऊन भेट घेतली व सांत्वन केले.

मोहिनी सागर तुपे ही संजय ठाकर यांची मुलगी. या मुलीचे श्रॅाफ यांच्या परिवाराशी घरोप्याचे संबंध आहे. जॅकी यांची सर्वसामान्यांशी नाळ जोडल्याचे अनेकदा दिसून येते. श्रॉफ यांचा मावळ तालुक्यातील चांदखेड येथे बंगला असून मुंबईमधून ते अनेकदा या ठिकाणी आराम करण्यासाठी येत असतात. अशाच एका भेटीदरम्यान त्याला मोहिनी यांच्या आजीचे निधन झाल्याचे समजले आणि जॅकी हे कडधे गावात  पोहचले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अंगावर पांढरी शाल, धोडीशी दाढी, डोळयावर चष्मा असलेला हा व्हीआयपी आपल्या घरी आल्याने ठाकर कुटुंबिय भारावले. जॅकी यांनी त्यांची आपुलकीने चौकशी केली. कै. तान्हाबाई या आजीच्या प्रतिमेस पुष्प वाहिले व १०० वर्षांपर्यंत निरोगी कशा राहिल्या याची माहिती घेतली. त्याचा दैनंदिन जीवन क्रम जाणून घेत परिवाराचे सांत्वन केले. यावेळी परिवारातील वडीलधाऱ्यांचे जॅकी श्राॅफ हे पाया पडले. सार्वजनिक व वैयक्तिक कार्यक्रमात वेगवेगळ्या घटनात संस्काराचे वेळोवेळी दर्शन घडविणाऱ्या जॅकी यांनी आजही वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. 

''सर्वांनी निरोगी राहण्यासाठी आजीप्रमाणे दिनक्रम ठेवा'' असे ठाकर परिवाराला जॅकी यांनी सांगितले. ठाकर परिवारातील सदस्य जॅकी श्रॅाफ यांच्या सूचना ऐकत होते, त्याच्याशी आदराने बोलत होते. कोरोना पुन्हा वाढत आहे आपण सर्वांनी या काळात काळजी घ्या व इतरांनी ही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. चहापाणी करून जॅकी मार्गस्थ झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT