पुणे

संक्षिप्त

CD

संक्षिप्त


जळगावात भेंडी पीक काढणीला गती
जळगाव ः जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागात भेंडीचे क्षेत्र स्थिर होते. त्यात सध्या काढणीला गती आली असून, पीक बऱ्यापैकी आहे. एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागात भेंडी पीक असते. तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागात भेंडी पीक बारमाही घेतले जाते. पावसाळ्यातही या भागात भेंडी असते. तसेच अनेक जण मार्चमध्ये लागवड करतात. परंतु मार्च व एप्रिलमधील लागवड घटली होती. भेंडीची लागवड फेब्रुवारी व मार्चमध्ये झाली आहे. ज्या भागात लागवड झाली आहे, त्यातून या महिन्यात काढणीला गती आली आहे. यामुळे सध्या भेंडीची बाजारातील आवक बरी आहे.

होळनांथे - मोहिदे पुलावर कठड्यांची गरज
जळगाव ः मोहिदे (ता. चोपडा) व होळनांथे (ता. शिरपूर) या दोन गावांना जोडणाऱ्या अनेर नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. या पुलाला संरक्षणाच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले कठडेच नाहीत. त्यामुळे लहानमोठे अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींचा तर मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मोहिदे व होळनांथे या दोन गावांना जोडणारा हा पूल २००६ मध्ये मंजूर झाला होता. जवळपास परिसरातील २५ गावांशी संबंध येणाऱ्या या पुलाची सद्यःस्थितीत दयनीय अवस्था झाली आहे. कठडे नसलेल्या या पुलावर जागोजागी लहानमोठे खड्डे पडून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार केली होती. पण त्याकडे प्रशासन गांभीर्याने पाहून काम करीत नाही, असाही आरोप केला जातो.


मका लागवड वाढणार
जळगाव ः खानदेशात मका लागवड यंदा वाढेल, असे संकेत आहेत. लागवडीत रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर भागात काहीशी वाढ होईल, असेही दिसत आहे. मक्यासाठी खानदेशात जामनेर, रावेर, चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा आदी भाग प्रसिद्ध आहे. मका लागवड पावसानंतर सुरू होईल. कमी कालावधीत येणाऱ्या मका वाणांना शेतकरी पसंती देतात. मका बियाण्याची मागणी किंवा व्यवस्था कृषी विभाग व यंत्रणा करून घेत आहे. मक्याची लागवड खानदेशात यंदा ७० ते ७५ हजार हेक्टरवर होईल, अशी स्थिती आहे. कारण अनेक जण बाजरी, कांदा पिकांऐवजी मका लागवड करतील, असे दिसत आहे. मक्याची लागवड काळ्या कसदार व मध्यम जमिनीतही केली जाते. चांगला किंवा मध्यम पाऊस असल्यासदेखील काही भागात पीक येते. शेतकरी एक-दोन वेळेस सिंचन करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

SCROLL FOR NEXT