Statue of Chhatrapati Shivaji Maharaj sakal
पुणे

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : जम्मू कश्मीर मधील छत्रपतींच्या पुतळ्यांचे मंगळवारी अनावरण

जम्मू कश्मीर मधील कुपवाडा येथे आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जम्मू कश्मीर मधील कुपवाडा येथे आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. ७) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

यावेळी कन्याकुमारी ते काश्मीर मार्गावरील सर्व नद्यांचे पाणी एकत्रित करून शिवरायांच्या मूर्तीचा जलाभिषेक करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि लष्करी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पूजन होणार आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे विश्वस्त अभयराज शिरोळे, ॲड. मिलिंद पवार, अखिल झांजले उपस्थित होते. जम्मू काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल मनोज सिन्हा, मैसूर येथील येडतोरे मठाचे पिठाधिपती प.पू. श्री श्री शंकर भारती महास्वामीजी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिनांक २० ऑक्टोबर रोजी मुंबई राजभवन येथून ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करीत कुपवाडा येथे रवाना करण्यात आला. साधारण २२०० किलोमीटरचा प्रवास करून हा पुतळा कुपवाडा येथे पोहोचला.

क्षीरसागर म्हणाले, ‘स्मारक स्थळी काही दिवसात भव्य दालन उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास दृकश्राव्य माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. तसेच शस्त्रांचे प्रदर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची माहिती या दालनात असणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT