doctor 
पुणे

उपाशी राहण्याची डॉक्‍टरांवर वेळ; थकित बिले न दिल्यास हॉटेल जेवण बंद करणार 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

पुणे - आधीच पगार नसलेल्या "जम्बो' तील डॉक्‍टर, परिचरिकांचे जेवण आणि नाष्टा बंद होण्याची वेळ आली आहे. हॉटेलची थकविलेली बिले 48 तासांत न दिल्यास जेवण मिळणार नसल्याचा मेल हॉटेल व्यवस्थापनाने "मेड-ब्रो'च्या अधिकाऱ्यांना पाठविला आहे. मुदतीत पैसे न भरल्यास हॉटेल सोडून जाण्याचा तगादाही डॉक्‍टरांकडे व्यवस्थापनाने लावला आहे. 

पुणे आणि पिंपरीतील जम्बो कोविड केअर सेंटरमधील डॉक्‍टर, परिचारिकांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या संपर्कातील विशेषत: थेट उपचार करणाऱ्यांच्या कुटुंबियांची काळजी म्हणून डॉक्‍टर, परिचारिकांच्या निवासाची सोय हॉटेलमध्ये केली आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सहा हॉटेलमध्ये 'जम्बो' तील अधिकारी, कर्मचारी राहात आहेत. मात्र, गेल्या महिना-दीड महिन्यापासून हॉटेलची बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे व्यवस्थापनाने आता थेट डॉक्‍टर, परिचारिक आणि अन्य कर्मचाऱ्यांना हॉटेल सोडून जाण्याची सूचना केली. त्यानंतरही ते न गेल्याने चहा, नाष्टा, जेवण मिळणार नाही, हेही बजाविले आहे. त्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली असून, ती शुक्रवारी दुपारी संपणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिलांकडे कानाडोळा 
सुरक्षिततेसाठी "जम्बो' तील डॉक्‍टरांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा खर्च महापालिका करणार होती. मात्र, तो बदलून हॉटेलचा खर्च महापालिकेच्या पैशातून मात्र, "पीएमआरडीए'ने दिलेल्या रक्कमेतून देण्याचा निर्णय झाला. मात्र, एकाही यंत्रणेने आजतागायत हॉटेलची बिले दिलेली नाहीत. 

उपचार करणाऱ्यांचे हाल 
जम्बोतील उपचार व्यवस्था सुधारल्यानंतर तेथील डॉक्‍टर, परिचारिकांना चांगल्या सुविधा देण्याचे आश्वासन देत, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनुष्यबळ उपलब्ध केले. त्यानंतर "जम्बो' व्यवस्थित चालविण्याची ताकीद पालकमंत्री अजित पवार यांनी राव यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीआरडीए' चे आयुक्त सुहास दिवसे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, समन्वयक राजेंद्र मुठे यांना दिली होती. त्यानंतर उपचार व्यवस्थेत मोठा बदल झाला; पण उपचार करणाऱ्यांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

निवास व्यवस्था असलेले हॉटेल ः 6 
डॉक्‍टर, कर्मचारी ः 200 
हॉटेलचा रोजचा खर्च (प्रती व्यक्ती) ः 2 हजार 800 
हॉटेलची थकलेले बिल ः 1 कोटी 

डॉक्‍टरांची व्यवस्था केलेल्या हॉटेलच्या बिलांत काही त्रुटी आहेत. त्यामुळे नव्याने बिले मागविली असून, ती आल्यानंतर तातडीने "पीएमआरडीए'कडे पाठविण्यात येतील. त्यानुसार एजन्सीकडे पैसे जमा होतील. त्यामुळे डॉक्‍टर, परिचारिकांच्या निवास व्यवस्थेत अडवणी येणार नाहीत. 
- राजेंद्र मुठे, समन्वयक, जम्बो व्यवस्थापन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT