पुणे

तोगटवीर क्षत्रिय समाजाचा ज्योती उत्सव

CD

तोगटवीर क्षत्रिय समाज ज्योती उत्सव भाग - १

PNE26W43069 सोलापूर ः सोवळ्यात देवी गीते आनंदात गाऊन ज्योती उत्सव साजरा करताना तोगटवीर क्षत्रिय समाजबांधव

डॉल्बी लावून नाही, तर सोवळ्यात देवीगीते गाऊन साजरा होतो ज्योती उत्सव

दीडशे वर्षांची परंपरा : तोगटवीर क्षत्रिय समाजाची श्री चौडेश्वरी देवी यात्रा; सोलापुरातील एकमेव असा धार्मिक उत्सव


सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता.१८ : सण-उत्सव, यात्रा म्हटली की डॉल्बीचा दणदणाट, मोठ्या आवाजातील वाद्ये आणि जल्लोषाच्या मिरवणुका हे सध्याच्या काळातील चित्र. मात्र, सोलापुरात याला अपवाद ठरणारा तोगटवीर क्षत्रिय समाजाचा श्री चौडेश्वरी मातेचा ज्योती उत्सव आजही आपल्या पारंपरिक स्वरूपात साजरा होतो. डॉल्बी किंवा मोठ्या वाद्यांचा गजर नाही, तर देवीची गीते हाच या उत्सवाचा मुख्य स्वर असतो. जवळपास दीड हजार भक्त सोवळ्यात सहभागी होऊन देवीची गीते गात ज्योतीची मिरवणूक काढतात. दीडशे वर्षांपासून जपली जाणारी ही परंपरा सोलापुरातील एकमेव असा धार्मिक उत्सव आहे.
उत्सवाची तयारीही मिरवणुकीइतकीच वैशिष्ट्यपूर्ण असते. जवळपास दहा ते बारा दिवस आधीपासून समाजबांधव एकत्र येतात. श्री चौडेश्वरी मातेची गीते म्हणत सामूहिक सराव केला जातो. गीतांचे शब्द, सूर आणि ताल यांची सांगड घालत समाजबांधव उत्सवासाठी सज्ज होतात. सरावावेळीही वाद्यांचा गोंगाट नसतो. मिरवणुकीच्या दिवशी उमटणारा देवीगीतांचा स्वर हा केवळ उत्स्फूर्त नसतो, तो अनेक दिवसांच्या भक्तीच्या सामूहिक सरावातून तयार झालेला असतो.
---------------------
या उत्सवात समाजाचे आठ समूह सहभागी होतात. या समूहांना ‘फंडी’ म्हटले जाते. प्रत्येक फंडीसमवेत ढोल असतात. मात्र, हे ढोल मिरवणुकीत गोंगाट निर्माण करण्यासाठी नव्हे, तर देवीगीतांना ताल देण्यासाठी असतात. ताशा, पिपाणी किंवा मोठमोठ्या ढोलांचा गजर या मिरवणुकीत नसतो. त्यामुळे ज्योतीची मिरवणूक वाद्यांच्या आवाजाने नव्हे, तर दीड हजार भक्तांच्या कंठातून उमटणाऱ्या देवीगीतांनी ओळखली जाते.
-------------------------------------
कोट PNE26W43085
आज सण-उत्सव म्हटला की डॉल्बी, मोठ्या आवाजातील वाद्ये आणि भव्य मिरवणुका हे चित्र दिसते. उत्सवाच्या दिवशी दीड हजार भक्त सोवळ्यात सहभागी होऊन हीच देवीगीते गात ज्योतीची मिरवणूक काढतात. फंडीच्या ढोलांची साथ असली तरी ताशा-पिपाणी किंवा मोठ्या वाद्यांचा गजर नसतो. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत याच स्वरूपात पोचवणे, हे आमचे कर्तव्य आहे.
- नागनाथ कोंतम, अध्यक्ष तोगटवीर क्षत्रीय समाज सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT