पुणे

महात्मा फुलेंचा विचार तरुणांनी जोपासावा

CD

पुणे, ता. २४ : ‘‘दुष्काळ, सामाजिक विषमता यांसारख्या समकालीन गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांवर काम करताना महात्मा फुले यांनी स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण केला. काळाची गरज ओळखून कार्यप्रवण होण्याचा त्यांनी दिलेला मंत्र तरुणांनी आत्मसात करावा,’’ असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने ‘महात्मा जोतिराव फुले आणि आजची तरुणाई’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा झाली, उद्‌घाटनप्रसंगी डॉ. सोनवणे बोलत होते. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर, ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी, महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. गणेश राऊत आदी उपस्थित होते.
डॉ. सोनवणे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा फुले यांच्या विचारांचा अभ्यास करण्याची गरज आहे. महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथातून पाण्याचे व्यवस्थापन आणि दुष्काळावरील उपाययोजनांबाबत विचार मांडले आहेत. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर स्वतःच्या कार्यातून उदाहरणही घालून दिले.’’
महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केल्याचे पांडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चाकणे यांनी केले, तर मंठाळकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT